माझ्याकडे आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशाची कोणतीही प्रत आलेली नाही. जोपर्यंत प्रत प्राप्त होत नाही. त्याचा अभ्यास वाचन करत नाही. तोपर्यंत मी पुढील कोणतीही कारवाई करणार नाही. किंवा त्यावर भाष्य देखील करणार नाही, असे मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडले.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवार, १८ सप्टेंबर रोजी १६ आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तर पुढील दोन आठवड्यात आमदार अपात्रता प्रकरणी काय निर्णय घेतला याची माहिती देण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले नार्वेकर?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, आमदार अपात्रता संदर्भातला निकाल देण्यासाठी माझ्याकडून कोणतीही दिरंगाई नाही आणि घाईपण होणार नाही. कारण यामध्ये कोणावरही अन्याय होता कामा नये, यासाठी आमचे कायदेतज्ज्ञ काम करत आहेत. विधानसभा अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्यासंदर्भात न्यायालयात कोणताही उल्लेख होणे अपेक्षित नाही. जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रत माझ्याकडे हाती येत नाही. त्यानंतर मी त्याचे संपूर्ण वाचन करेन, त्यानंतर पुढील कार्यवाही काय करायची. न्यायालयाने काय म्हटले आहे. त्यानुसारच पुढील पावले उचलले जातील. अशी भूमिका राहुल नार्वेकरांनी मांडली.
Join Our WhatsApp Community