Stock Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ६७,६०० वर बंद

निफ्टी ५९ अंकांच्या घसरणीसह २०, १३३ वर स्थिरावला

160
SIPs Demat Accounts on Rise : एसआयपी आणि डिमॅट खात्यांची वाढती संख्या काय सांगते?
SIPs Demat Accounts on Rise : एसआयपी आणि डिमॅट खात्यांची वाढती संख्या काय सांगते?

जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान आज सोमवारी शेअर बाजारात (Stock Market)  मोठी घसरण झाली. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स २४१ अंकांनी घसरला आणि ६७,५९६ वर बंद झाला. निफ्टी ५९ अंकांच्या घसरणीसह २०, १३३ वर स्थिरावला.

पॉवर, ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांकही वधारले, तर रियल्टी आणि मेटल निद्रेशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बँक आयटी, फार्मा निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.२७ टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप ०.६० टक्क्यांनी घसरला.

(हेही वाचा – Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवर काय म्हणाले राहुल नार्वेकर?)

कुठे घसरण- कुठे वाढ ?
सेन्सेक्स आज ६७,६६५ वर खुला झाला होता. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, टाटा स्टिल, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, रिलायन्स, टेक महिंद्रा, जेएसड्ब्लयू स्टील हे शेअर्स घसरले, तर पॉवर ग्रिड, टायटन, एम अँड एम, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स एसबीआय, नेस्ले इंडिया, आयटीसी, हिंदुस्थान लिव्हर हे शेअर वाढले.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.