Recruitment : कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा जीआर रद्द करा – अधिकारी महासंघाचा इशारा

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

265
Recruitment : कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा जीआर रद्द करा - अधिकारी महासंघाचा इशारा
Recruitment : कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा जीआर रद्द करा - अधिकारी महासंघाचा इशारा

बाह्ययंत्रणेद्वारे १३८ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. राज्य सरकारने हा जीआर तातडीने रद्द करावा अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे. हा जीआर रद्द न केल्यास राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संयुक्त आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याच्या अविचारी शासन निर्णयामुळे राज्यभर अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनातील नियमानुसार नोकर भरती (Recruitment) साठी लोकसेवा आयोग, सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार केंद्रे (एम्लॉयमेंट एक्सचेंज) आणि खातेनिहाय कमिट्या, अशी दर्जेदार व्यवस्था असताना खाजगी भरती (Recruitment) साठी नवीन संस्थांना अधिकार देणे हे अनाकलनीय आहे. सर्वच प्रशासकीय विभागांत जवळपास ३ टक्के पदे निवृत्तीने दरवर्षी रिक्त होत असताना, गेल्या आठ-दहा वर्षांत नवीन भरती (Recruitment) चे प्रमाण अत्यल्प आहे.

राज्य शासनातील विविध संवर्गांत अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त असून, एकूण मंजूर पदांच्या (७.१७ लाख) तब्बल ३५ टक्के पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे कंत्राटी पध्दतीऐवजी नियत मार्गाने समयमर्यादेत भरण्यात यावीत, अशी अधिकारी महासंघाची आग्रही मागणी आहे. शासकीय खर्चामध्ये बचत करण्याच्या दृष्टीने शासनाने आऊट सोर्सिंगचे धोरण तयार केले होते. मात्र बाह्य यंत्रणेकडून भरण्यात येणाऱ्या पदांना नियमित पदांपेक्षा जास्त पगार द्यावा लागणार असल्याची बाब महासंघाने सोदाहरण शासनाच्या नजरेस आणली आहे.

(हेही वाचा – Stock Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ६७,६०० वर बंद)

जर शासनाची बचतच होणार नसेल, तर बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्याची कोणतीही गरज नाही. बाह्य यंत्रणांना भरघोस रक्कम देऊन त्यांच्यामार्फत आलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम, शिस्त व अपिल याबाबत कोणतीच जबाबदारी नसते, त्यामुळे त्यांची शासन व जनता यांचेप्रती विशेष बांधिलकीही नसते. कंत्राटी अधिकाऱ्यांकडे वित्तीय जबाबदारी आल्यास गोपनीयता व वित्तीय शिस्त मोडून वित्तीय घोटाळे होण्याची अधिक शक्यता आहे. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

संशयातीत कंत्राटदारांद्वारे केलेल्या नोकरभरती (Recruitment) ने प्रशासकीय गुणवत्तेला धोका पोहचणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात भरती (Recruitment) ची परीक्षा घेणाऱ्या कंत्राटी संस्थेतील कर्मचाऱ्यांने परीक्षेचे पेपर फोडून भ्रष्टाचार केल्याचे अलिकडचे उदाहरण अतिशय बोलके आहे. त्यामुळे बाह्ययंत्रणेद्वारे १३८ संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा जीआर तात्काळ रद्द करावा, अशी अधिकारी महासंघाच्या वतीने आग्रही मागणी असल्याचे पत्र देण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.