वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे गणेश चतुर्थी. यावर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरा होत आहे. यानिमित्त शेअर बाजार बंद राहणार की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. (National Stock Exchange)
NSE (National Stock Exchange of India Limited) वर उपलब्ध सुट्ट्यांच्या यादीनुसार, गणेश चतुर्थीला शेअर बाजार बंद राहणार आहे. NSEच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, शेअर बाजार १९ सप्टेंबर २०२३ रोजी बंद राहील. याआधी १५ ऑगस्टला शेअर बाजार बंद होता. इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये मार्केटमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही.
(हेही वाचा – National Stock Exchange : गणेश चतुर्थीनिमित्त उद्या शेअर बाजार बंद राहणार का? वाचा सविस्तर सुट्ट्यांची माहिती)
‘या’ तारखांना शेअर बाजार बंद राहील
शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, गणेश चतुर्थीनिमित्त १९ सप्टेंबर रोजी मार्केट बंद राहणार आहे. यानंतर २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, २४ ऑक्टोबरला दसरा, १४ नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदा, २७ नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या निमित्ताने सेन्सेक्स आणि निफ्टी बंद राहतील. १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात फक्त मुहूर्त ट्रेडिंग असेल. मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळा नंतर जाहीर केल्या जातील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community