Women’s Reservation Bill : नव्या संसद भवनात प्रवेश; पहिल्या भाषणात पंतप्रधानांकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा

155
Women's Reservation Bill : नव्या संसद भवनात प्रवेश; पहिल्या भाषणात पंतप्रधानांकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा
Women's Reservation Bill : नव्या संसद भवनात प्रवेश; पहिल्या भाषणात पंतप्रधानांकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा

नव्या संसदेतील पहिल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. (Women’s Reservation Bill) आज संसदेत चालू होणाऱ्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक मांडले जाणार आहे, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. कामकाजात महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. यासाठी कायदा करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. लोकसभा आणि विधानसभा यांत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले आहे. ते विधेयक आज संसदेच्या विशेष सत्रात मांडले जाणार आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व खासदारांनी एकमताने लक्ष द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

(हेही वाचा – Constitution House : जुने संसद भवन झाले आता संविधान भवन; सेंट्रल हॉलमध्ये भावूक वातावरणात निरोप समारंभ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अटलजींच्या कार्यकाळात अनेक वेळा महिला आरक्षण विधेयक आणले गेले; पण ते विधेयक मंजुर करण्यासाठी डेटा गोळा करता आला नाही आणि त्यामुळे अटलजींचे स्वप्न अपूर्णच राहिले. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या शक्तीला आकार देण्याचे काम करण्यासाठी देवाने मला निवडले आहे. पीएम मोदींनी महिला आरक्षणाला ‘नारी शक्ती वंदन कायदा’ असे नाव दिले आहे. (Women’s Reservation Bill)

संसदीय लोकशाहीचा ‘गृहप्रवेश’

आज जेव्हा आपण नवीन संसद भवनात प्रवेश करत आहोत, जेव्हा संसदीय लोकशाहीचा ‘गृहप्रवेश’ होत आहे, तेव्हा येथे आपण स्वातंत्र्याच्या पहिल्या किरणाचे साक्षीदार आहोत आणि जो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. पवित्र सेंगोल हे ते सेंगोल आहे, ज्याला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी स्पर्श केला होता; म्हणून तो आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या भूतकाळाशी जोडतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनात प्रवेश करताना भावना व्यक्त केल्या. (Women’s Reservation Bill)

मिच्छामी दुक्कडम

‘आज संवत्सरीही साजरी केली जाते, ही एक अद्भुत परंपरा आहे. आजच्या दिवशी आपण ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणतो, तो आपल्याला जाणूनबुजून किंवा नकळत दुखावलेल्या व्यक्तीची माफी मागण्याची संधी देतो. मला सर्व संसद सदस्यांना आणि देशातील जनतेला ‘ मिच्छामी दुक्कडम’ म्हणायचे आहे’, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. (Women’s Reservation Bill)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.