Nawaz Sharif : भारत चंद्रावर पोहचला, पण पाकिस्तान कंगाल झाला; काय म्हणाले नवाज शरीफ? 

207

भारत आज चंद्रावर पोहोचला आहे. G20 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. भारताकडे 600 अब्ज डॉलर्सचा खजिना आहे. त्याचवेळी पाकिस्तान चीन आणि अरब देशांसह जगभरातून 1-1 अब्ज डॉलर्सची मागणी करत आहे. अशा स्थितीत त्यांच्यासमोर आपली काय इज्जत राहिली? आपण कंगाल होण्याच्या मार्गावर आहोत, असे असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांनी म्हटले.

नवाज म्हणाले, ज्यांनी पाकिस्तानची ही अवस्था केली ते देशाचे सर्वात मोठे गुन्हेगार आहेत. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) सरकारने देशाला डिफॉल्ट होण्यापासून वाचवले आहे, अन्यथा देशात पेट्रोलची किंमत 1000 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचली असती. नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांनी देशाच्या स्थितीसाठी निवृत्त लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, माजी आयएसआय प्रमुख फैज हमीद आणि माजी सरन्यायाधीश मियाँ साकिब निसार यांना या सर्वासाठी जबाबदार धरले.

पाकिस्तानात भाकरीसाठी लोकांची तडफड 

नवाज म्हणाले, आज देशातील गरीब लोक भाकरीसाठी तडफडत आहेत. देशाची ही स्थिती कोणी आणली आहे?  2017 मध्ये पाकिस्तानात हे दृश्य नव्हते. त्याकाळी मैदा, तूप, साखर हे सर्व स्वस्तात मिळायचे. विजेची बिले लोकांच्या खिशानुसार यायची. आज लोकांना 30 हजार रुपयांपर्यंत वीज बिल येते. अशा स्थितीत मुलांचे पोट भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. माझ्या राजवटीत देशाची प्रगती होत होती. असे असतानाही मला कोर्टात 27 वर्षांची शिक्षा झाली. मला वर्षानुवर्षे देशाबाहेर राहावे लागले. या सगळ्यामागे जनरल बाजवा आणि जनरल फैज यांचा हात होता. 1990 मध्ये भारताने आम्हाला पाहून आर्थिक सुधारणा आदेश लागू केला. त्यांचा देश आज कुठे पोहोचला आहे ते पाहा. वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या देशाकडे 1 अब्ज डॉलर्सही नव्हते आणि आज 600 अब्ज डॉलर्स आहेत.

(हेही वाचा Women’s Reservation Bill : 1931 पासून तब्बल 10 वेळा अपयशानंतर विधेयक झाले मंजूर; मोदी सरकारने करुन दाखवले)

दरम्यान, पीएमएल-एन पक्षाचे उपाध्यक्ष हमजा शाहबाज म्हणाले, नवाज यांनी पाकिस्तानला अणुशक्ती राष्ट्र बनवले होते, पण आज आपण भिकारी देश बनलो आहोत. हे खूप लाजीरवाणे आहे. आता पाकिस्तानची जनता नवाज शरीफ  (Nawaz Sharif) यांना पंतप्रधान करून देशाचे भविष्य सुरक्षित करेल. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांनी सुमारे आठवडाभरापूर्वी जाहीर केले होते की, नवाज 21 ऑक्टो

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.