भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सूर्याच्या संशोधनासाठी पाठवलेले ‘आदित्य-L1’ हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून सूर्याच्या दिशेने पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले आहे. सुमारे 110 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान L1 बिंदूच्या कक्षेत प्रवेश करेल. इस्रोने रात्री उशिरा आदित्य-L1 मिशन विषयी ही अद्ययावत माहिती दिली. इस्रोने कळवले की, ट्रान्स-लॅग्रेन्जियन पॉइंट 1 इन्सर्शन पूर्ण झाले आहे. अंतराळयान आता एका मार्गावर आहे, जे त्याला सूर्य-पृथ्वी L1 बिंदूवर घेऊन जाईल.
(हेही वाचा – Women’s Reservation Bill : महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर; श्रेयवादावरून गदारोळ होऊन कामकाज तहकूब)
पृथ्वीच्या कक्षेबाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोचे हे सलग पाचवे यश आहे. सूर्य मोहिमेपूर्वी इस्रोने चंद्रयान-3 यशस्वीपणे प्रक्षेपित करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले होते.
Aditya-L1 Mission:
Off to Sun-Earth L1 point!The Trans-Lagrangean Point 1 Insertion (TL1I) maneuvre is performed successfully.
The spacecraft is now on a trajectory that will take it to the Sun-Earth L1 point. It will be injected into an orbit around L1 through a maneuver… pic.twitter.com/H7GoY0R44I
— ISRO (@isro) September 18, 2023
फेब्रुवारीमध्ये सूर्याचा पहिला फोटो दिसेल
आदित्य-L1 वरून सूर्याचा पहिला फोटो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये उपलब्ध होईल. त्यातील VELC या उपकरणाची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. तो सूर्याचा अभ्यास सुरू करेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community