युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ 2023 च्या यादीत कर्नाटकातील Hoysala समूहातील मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. होयसळ मंदिर भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आणि पूर्वजांच्या कुशलतेचा पुरावा असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
होयसाळेश्वर मंदिर कर्नाटकातील हसन जिल्ह्यात आहे. होयसळेश्वर मंदिर ते म्हैसूर विमानतळ हे अंतर अंदाजे 150 किमी आहे. हसन रेल्वे जंक्शन हे कर्नाटकसह दक्षिण भारतातील जवळपास सर्व प्रमुख शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे. हसन जंक्शन होयसलेश्वर मंदिरापासून फक्त 30 किमी अंतरावर आहे.
होयसळेश्वराचे मंदिर उंच चबुतऱ्यावर बांधलेले असून या चबुतऱ्यावर 12 कोरीव थर आहेत. होयसाळ वास्तुकलेचे हे एक उत्तम उदाहरण आहे कारण या 12 थरांना जोडण्यासाठी चुना सिमेंट किंवा इतर कोणतीही सामग्री वापरली गेली नाही. येथील कोरीव काम थक्क करणारे आहे. एखाद्या मशीनच्या मदतीने देखील होणार इतके सुरेख कोरीवकाम येथे पहायला मिळते.
कर्नाटकातील Hoysala मंदिराची निर्मीती 1121 मध्ये करण्यात आली. या मंदिरातील शिल्पकलारविडीयन बांधकाम शैली आणि नागारा शैली या दोन्हीपेक्षा वेगळे आहे.
Hoysala राजांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 1,500 मंदिरे बांधली. कर्नाटक राज्यातील होयसळ समूहातील मंदिरं राजा विष्णुवर्धनाच्या कारकिर्दीत बांधली गेली.
इसवी सन 10 व्या ते 14 व्या शतकादरम्यान दक्षिण भारतीय Hoysala साम्राज्य हे अस्तित्वात होते. या होयसळ साम्राज्याने सध्याच्या कर्नाटक राज्याच्या बहुतांश भागांवर तसेच गोव्याच्या काही भागांत राज्य केले.
Join Our WhatsApp Community