समृद्धी महामार्गाचे काम हे तीन वर्षांत होऊ शकते, तर कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प बारा वर्षानंतरही पूर्ण होऊ शकत नाही, याबद्दल जाहीर नाराजी रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. कशेडी बोगदा सुरू झाल्याने कोकणवासियांना दिलासा मिळाला. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे, त्याबाबत माजी मंत्री रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली आणि सतेत असूनही नाराजी व्यक्त करत सरकारला घरचा आहे दिला.
माजी मंत्री रामदास कदम म्हणाले की, समृध्दी महामार्ग तीन वर्षांत होऊ शकतो मग मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण का झाले नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगून सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. पण भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजवर अनेकवेळा या मार्गाची पाहणी केली. त्यामुळे ते चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना यश येऊ दे. हा महामार्ग लवकर पूर्ण होऊन दे यासाठी आपल्या शुभेच्छा असल्याचे कदम यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील
माजी मंत्री रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाच्या वकिलाने कागदपत्रे देण्यास विलंब लावल्यामुळे निकाल लागण्यास वेळ लागला. मात्र सारे खापर विधानसभा अध्यक्षांवरती फोडले जाते आणि हे उद्धव ठाकरे गटाचे काही जण टीका करत आहे. उद्या अशी वेळ येईल की उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील.
सामंतांचा भाऊ खासदार का होऊ शकत नाही?
रामदास कदम म्हणाले की, नारायण राणे मंत्री होऊ शकतात त्यांचा मुलगा खासदार होऊ शकतो. मग उदय सामंत मंत्री होऊ शकतात, तर मग त्यांचा भाऊ किरण सामंत खासदार का होऊ शकत नाही. त्यामुळे किरण सामंत यांना आपला पाठिंबा आहे. पण निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांचे आहेत, असे सांगून भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर बोलणे टाळले.
Join Our WhatsApp Community