Rain Update : मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाची हजेरी

राज्यभरात आगामी तीन ते चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

105
Rain Update :मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाची हजेरी
Rain Update :मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाची हजेरी

देशभरात मंगळवारी ( १९ सप्टेंबर) गणेशोत्सवाचा सोहळा पार पडला. घरोघरी गणरायाचे आगमन झाले. राज्यभरात गणरायाच्या आगमनाला अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली (Rain Update). त्याच बरोबरीने बुधवारी सकाळपासुनच पुण्यासह मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे.

राज्यभरात आगामी तीन ते चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर गुरुवारी (२१ सप्टेंबर) पुण्यासह घाटमाथ्यावर आणि इतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

(हेही वाचा : Clean up program : देशभरात राबवला जातोय स्वच्छतेचा पंधरवडा; ५० हजार तरुणांचा सहभाग)

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे.तर आगामी दोन दिवसांमध्ये पुण्यासह राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर बुधवारी विदर्भात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. तर काही ठिकाणी मात्र अद्यापही पावसाची अपेक्षा कायम आहे. कोकण परिसरात तुरळक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर शहराला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं तर शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.