सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच गणेशोत्सवाचे अध्यात्मिक वातावरण असताना पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईला वेग आला आहे. मनमाडमध्ये एका संशयिताला बुधवारी अटक करण्यात आली आहे. आयबी आणि एटीएसने संयुक्तिक ही कारवाई केली. (ATS Action )मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय संबधित व्यक्तिवर होता. चौकशी केल्यावनंतर इसमाला सोडून देण्यात आले. पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.
२००६ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बसोफ्टात हा इसम आरोपी होता. या संशयितावर तपास यंत्रणा लक्ष ठेवून होता. हा इसम मंडळांचे चित्रीकरण, रेकी करत होता. आयबीने स्थानिक मनमाड पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते. तो निसटला नंतर नगरसूल गाडीने प्रवास करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरु होती. मात्र काही निष्पन्न न झाल्याने त्याची सुटका केली.
(हेही वाचा : FASTag : आता प्रवाशांना लवकरच फास्टॅगमधून कापलेली रक्कम परत मिळणार)
Join Our WhatsApp Community