Mohammed Shami : अखेर मोहम्मद शामीला जामीन मंजूर; पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर

156
Mohammed Shami : अखेर मोहम्मद शामीला जामीन मंजूर; पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) रोजी पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात मोहम्मद शामीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मोहम्मद शामीच्या पत्नीनं त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मोहम्मद शामीला अलीपूर कोर्टानं सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. अखेर सुनावणीअंत अलीपूर कोर्टानं मोहम्मद शामीला जामीन मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीपूर्वीच मोहम्मद शामीच्या वतीनं जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत (ODI) आणि त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाचा भाग असलेल्या (Mohammed Shami) मोहम्मद शामीसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. शामीसोबतच त्याचा भाऊ मोहम्मद हसिमचाही जामीन अर्ज न्यायालयानं मंजूर केला आहे.

(हेही वाचा – India vs Canada : कॅनडाच्या कुरापती सुरूच; भारतातील काही राज्ये असुरक्षित असल्याचे सांगत कॅनडाने दिला नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

मोहम्मद शामीचे (Mohammed Shami) वकील सलीम रहमान यांनी सुनावणीबाबत बोलताना सांगितलं की, जामीन मिळाल्यानंतर शामी आणि त्याचा भाऊ हसिम कोर्टात हजर झाले, दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांची याचिका न्यायालयानं मान्य केली. दरम्यान, शामीची पत्नी हसीन जहाँ हिने ८ मार्च २०१८ रोजी जादवपूर पोलीस ठाण्यात शामी (Mohammed Shami) आणि त्याच्या भावावर छळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता.

नेमकं प्रकरण काय?

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी आणि त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद थेट कोर्टात पोहोचला होता. पूर्वाश्रमीच्या पत्नीनं मोहम्मद शामीवर अनेक गंभीर आरोप केले होते. शामीचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यानं हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप हसीन जहाँनं केला आहे. इतकंच नाही तर त्यानं दौऱ्यावर असताना कॉल गर्ल्सला हॉटेल रुममध्ये बोलावल्याचा गंभीर आरोपही हसीननं केला आहे. या प्रकरणात, अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयानं 29 ऑगस्ट 2019 रोजी शामीविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. शामीने मात्र या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिलं. यावेळी न्यायालयानं अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय दिला होता. अखेर अलीपूर न्यायालयात मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीवेळी मोहम्मद शामीला जामीन मंजूर झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.