Khalistani Terrorism : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा भारताला चिथवले; कॅनडातील दूतावास बंद करण्याची धमकी

192
Khalistani Terrorism : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा भारताला चिथवले; कॅनडातील दूतावास बंद करण्याची धमकी
Khalistani Terrorism : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा भारताला चिथवले; कॅनडातील दूतावास बंद करण्याची धमकी

जे शीख खलिस्तानचे समर्थक आहेत तेच कॅनडात राहतील. (Khalistani Terrorism) हिंदूंचा देश भारत असून त्यांनी कॅनडा सोडून भारतात परतावे, अशी धमकी ‘शीख फॉर जस्टिस’चा (एसएफजे) खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एका व्हिडिओद्वारे दिली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला असताना गुरपतवंत सिंग पन्नू यानेही भारताला चिथावणी दिली आहे. गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडात मारले गेलेले हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येसाठी भारतीय दूतावासाचे अधिकारी संजय कुमार वर्मा यांना जबाबदार धरले असून किल इंडिया मूव्हमेंट अंतर्गत 29 ऑक्टोबर रोजी कॅनडातील सरे येथे पुन्हा सार्वमत घेण्यात येणार असून वर्मा यांच्या विरोधात मतदान घेण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Exam Date : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी JEE, NEET, NET सह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर)

भारतीय दूतावासांना म्हटले दहशतवादी घरे

दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने धमकीच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, कॅनडाची भूमी फक्त खलिस्तानींसाठी आहे. (Khalistani Terrorism) खलिस्तानी नेहमीच कॅनडाच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि त्यांचा इथल्या राज्यघटनेवर विश्वास आहे. कॅनडाच्या राज्यघटनेनुसार हिंदू येथे राहू शकत नाहीत. त्यांचा देश भारत आहे. येथे राहण्यासाठी त्यांना धर्म बदलावा लागेल.परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये दररोज शिखांना कसे मारायचे याचे नियोजन केले जाते. यानंतर परदेशात राहणाऱ्या शिखांची हत्या केली जात आहे. परदेशातील भारताची दहशतवादी घरे बंद केली जातील.

डेथ टू इंडिया मोहीम जागतिक स्तरावर करण्याची धमकी 

दुसऱ्या व्हिडिओमध्ये पन्नू याने धमकावले आहे की, व्हँकुव्हर, ओटावा आणि टोरंटो येथील भारतीय दूतावास 25 सप्टेंबरला बंद होतील.  25 सप्टेंबर रोजी आम्ही ‘डेथ टू इंडिया’ (भारत मुर्दाबाद) मोहीम जागतिक स्तरावर सुरू करणार आहे.

दरम्यान १८ सप्टेंबर रोजी ब्रिटिश कोलंबियातील प्रमुख शीख नेते आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या सरकारने कारवाई करून एका भारतीय उच्चाधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. (Khalistani Terrorism) याबरोबर हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केले आहेत. कॅनडाच्या संसदेत निवेदन देताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, कॅनडाची तपासयंत्रणा भारत सरकारच्या सहभागाची चौकशी करत आहे. १८ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या संसदेत चर्चेत बोलताना कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी दावा केला की, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकार्‍यांकडे विश्वास ठेवण्याची कारणे आहेत की “भारत सरकारच्या एजंटांनी” कॅनेडियन नागरिकाची हत्या केली, ज्यांनी अध्यक्ष म्हणूनही काम केले. कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा भारत सरकारचे एजंट आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधाच्या विश्वासार्ह आरोपांचा सक्रियपणे पाठपुरावा करत आहेत. कॅनडातील एका नागरिकाच्या हत्येमध्ये परकीय हात किंवा सरकारचा सहभाग अस्वीकारार्ह आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.