Talathi Bharti : ४४६६ तलाठी जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज; ३ टप्प्यांत परीक्षा; निकाल कधी ?

189
Talathi Bharti : ४४६६ तलाठी जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज; ३ टप्प्यांत परीक्षा; निकाल कधी ?
Talathi Bharti : ४४६६ तलाठी जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज; ३ टप्प्यांत परीक्षा; निकाल कधी ?

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. (Talathi Bharti) ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. ही परीक्षा १४ सप्टेंबरला संपली. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे केले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली आहेत.

(हेही वाचा – Exam Date : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी JEE, NEET, NET सह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर)

उमेदवारांना आक्षेप नोंदवण्याची मुभा

परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये निकालाची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली आहे. (Talathi Bharti)

दरम्यान, परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचेही प्रकार घडले आहेत. या प्रकरणी टीसीएस कंपनीकडून ७-८ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या. त्यानुसार गुन्हे दाखल केले आणि काहींना अटकही केली आहे. याशिवाय स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले. (Talathi Bharti)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.