43 वैमानिकांच्या राजीनाम्यानंतर आकासा एअर लाईन्स अडचणीत आली आहे. त्यांची उड्डाणे बंद करावी लागत आहेत. वैमानिकांनी अचानक राजीनामा दिल्याने सप्टेंबरमध्ये कंपनीला दररोज 24 उड्डाणे रद्द करावी लागली. विमान कंपनीने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली.
एअर लाईन्सच्या (Airlines) वकिलाने न्यायमूर्ती मनमीत प्रितम सिंग अरोरा यांना सांगितले की, ‘वैमानिकांनी अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे अकासा एअरला दररोज अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. प्रथम अधिकार्यांसाठी नोटीस कालावधी 6 महिने आणि कॅप्टनसाठी 1 वर्ष होता. बिझनेस स्टँडर्डमधील एका अहवालात म्हटले आहे की, पायलट अकासा एअरच्या प्रतिस्पर्धी एअरलाइनमध्ये (Airlines) सामील झाले आहेत. त्यात असेही म्हटले आहे की, अकासा एअरच्या एका अधिकाऱ्याने प्रतिस्पर्धी गटाला पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती आणि त्याला अनैतिक म्हटले होते.
या महिन्यात 600-700 उड्डाणे रद्द होणार
Akasa दिवसाला 120 उड्डाणे चालवते. त्यामुळे या महिन्यात 600-700 उड्डाणे रद्द होऊ शकतात. ऑगस्टमध्येही 700 उड्डाणे रद्द करावी लागली होती. एअरलाइन्सने (Airlines) न्यायालयाला विनंती केली आहे की विमान वाहतूक नियामक महासंचालनालय (DGCA) ला अनिवार्य सूचना कालावधी नियम लागू करण्याचे अधिकार द्यावेत. कंत्राटी नोटीस कालावधी पूर्ण न करता निघून गेलेल्या वैमानिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची विमान कंपनीची मागणी आहे. यासोबतच उड्डाणे रद्द केल्यामुळे झालेल्या महसूलाच्या नुकसानीची भरपाई म्हणून सुमारे 22 कोटी रुपयांची मागणी केली जात आहे.
आकासाला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ग्रीन सिग्नल मिळाला
lदुसरीकडे, इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालात म्हटले आहे की, आकासाला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हिरवा सिग्नल देण्यात आला आहे, परंतु ते ज्या देशांत उड्डाणे चालवू इच्छितात त्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. सध्या ही विमानसेवा केवळ देशांतर्गत मार्गांवर चालते.
Join Our WhatsApp Community