Khalistani Terrorism : कॅनडातील प्रकरणात न्याय होईल, यासाठी प्रयत्न करू; ब्रिटनच्या खासदाराकडून खलिस्तानी दहशतवादाविषयी चिंता व्यक्त

219
Khalistani Terrorism : कॅनडातील प्रकरणात न्याय होईल, यासाठी प्रयत्न करू; ब्रिटनच्या खासदाराकडून खलिस्तानी दहशतवादाविषयी चिंता व्यक्त
Khalistani Terrorism : कॅनडातील प्रकरणात न्याय होईल, यासाठी प्रयत्न करू; ब्रिटनच्या खासदाराकडून खलिस्तानी दहशतवादाविषयी चिंता व्यक्त

कॅनडामधून येत असलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. (Khalistani Terrorism) ब्रिटनमधील व विदेशातीलही अनेक शीख समुदायाच्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. हे लोक संभ्रमित, संतप्त व घाबरलेले आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या मित्रदेशांच्या मदतीने काम करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आम्हीही ब्रिटनच्या सरकारच्या संपर्कात असून कॅनडातील या प्रकरणात न्याय होईल यासाठी प्रयत्न करू, असे उद्गार ब्रिटनच्या संसदेतील लेबर पार्टीचे शीख खासदार तन्मनजीत सिंग धेसी यांनी काढले आहेत.

(हेही वाचा – Nerul-Uran Railway: खारकोपर ते उरण लोकल दिवाळीपर्यंत सुरु होणार)

जून महिन्यात कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेच्या 3 महिन्यांनंतर कॅनडाने हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या प्रकरणात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप करत भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची कॅनडातून हकालपट्टी केली. त्यावर भारतानेही आरोप फेटाळत जशास तशी भूमिका घेतली व कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. या प्रकरणाचे पडसाद थेट ब्रिटनच्या संसदेमध्येही उमटले आहेत. ब्रिटनच्या संसदेतील शीख खासदारांनी यासंदर्भात संसदेत भूमिका मांडली आहे. (Khalistani Terrorism)

अवघ्या १० दिवसांपूर्वी जी २० परिषदेच्या निमित्ताने भारतात पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन करताना दिसले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या दृष्टीने कॅनडाच्या तपास यंत्रणा सखोल चौकशी करत असल्याचं निवेदन कॅनडाच्या संसदेत केलं. त्यापाठोपाठ कॅनडानं भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. भारतानंही कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी करून जशास तसं उत्तर दिले. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटू लागले आहेत. (Khalistani Terrorism)

अमेरिकन अभ्यासकांनी कॅनडाला ठणकावले

या प्रकारावरून अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक मायकेल रुबिन यांनी कॅनडाला सल्ला दिला आहे. “पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी घेतलेली भूमिका निर्लज्जपणाची आणि वेडगळ आहे. ते आगीशी खेळत आहेत. या भूमिकेमुळे त्यांना दीर्घकाळात राजकीय फायदा होईलही. पण याला नेतृत्व म्हणत नाहीत”, असं ते म्हणाले. तसेच, भारत व पाकिस्तानबाबत कॅनडा वेगवेगळी भूमिका घेत असल्याचाही दावा त्यांनी केला.

यासंदर्भात भारताशीही चर्चा केली आहे – ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनीही ट्रुडो यांच्या आरोपांवर चिंता व्यक्त केली आहे. “या बातम्या चिंताजनक असून त्यासंदर्भात सखोल चौकशी चालू असल्याचे आम्हाला समजले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही यासंदर्भात भारताशीही चर्चा केली आहे”, असं वोंग म्हणाल्या आहेत. (Khalistani Terrorism)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.