NCP : सुप्रिया सुळे यांची विधाने वैफल्यग्रस्त भूमिकेतून; सुनील तटकरे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार

142
NCP : सुप्रिया सुळे यांची विधाने वैफल्यग्रस्त भूमिकेतून; सुनील तटकरे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार
NCP : सुप्रिया सुळे यांची विधाने वैफल्यग्रस्त भूमिकेतून; सुनील तटकरे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे. (NCP) या प्रकरणी न्यायालयाचे निर्णयही आलेत. सध्या त्या वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशी विधाने करत आहेत. त्यांना हे विधान टाळता आले असते. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामागे अवघा महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा व विधान परिषदेतील सदस्यही अजित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला दिवसागणिक पाठिंबा वाढत आहे; मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे सुप्रिया सुळे यांना आलेले नैराश्य अद्याप दूर झाल्याचे दिसत नाही, असे प्रत्युत्तर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी संसदेत सत्ताधारी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची खुली चौकशी करण्याचे आव्हान दिले होते. त्याविषयी तटकरे बोलत होते. ‘अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या निर्णयाचा सुप्रिया सुळे यांना जबर धक्का बसला. त्या नैराश्यात गेल्या. त्यांचे नैराश्य अजून दूर झाल्याचे दिसत नाही’, असे सुनील तटकरे यांनी याविषयी म्हटले आहे.

(हेही वाचा – Khalistani Terrorism : कॅनडातील प्रकरणात न्याय होईल, यासाठी प्रयत्न करू; ब्रिटनच्या खासदाराकडून खलिस्तानी दहशतवादाविषयी चिंता व्यक्त)

‘पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात एनसीपीचा उल्लेख नॅचरल करप्ट पार्टी असा केला होता. (NCP) त्यानंतर भोपाळमध्ये त्यांनी राष्ट्रवादीवर सिंचन व बँक घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांनी या घोटाळ्यांची चौकशी करावी’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना केली आहे. सु्प्रिया सुळे यांच्या चौकशीच्या मागणीमुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ही नात्याची गोष्ट नाही – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करण्याची मागणी केली, तेव्हा सत्ताधारी बाकावरून कुणीतरी अजित पवार यांचे नाव घेतले. त्यावर त्या म्हणाल्या की, ही नात्याची गोष्ट नाही. संसदेत माझे 1 नव्हे तर तब्बल 800 भाऊ आहेत. (NCP)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.