Khalistan In Canada : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा भारतविरोधी कट फसला; काय आहे वॉशिंग्टन पोस्टचा अहवाल…

154
Khalistan In Canada : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा भारतविरोधी कट फसला; काय आहे वॉशिंग्टन पोस्टचा अहवाल...
Khalistan In Canada : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा भारतविरोधी कट फसला; काय आहे वॉशिंग्टन पोस्टचा अहवाल...

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना अमेरिका आणि ब्रिटनलाही आपल्या ‘कारस्थानाचा’ भाग बनवायचे होते. (Khalistan In Canada) मात्र, या प्रयत्नात त्यांना मोठा धक्का बसला आणि दोन्ही देशांनी यात सहभागी होण्यास नकार दिला. ट्रुडो यांनी अमेरिका आणि ब्रिटनला आपल्या बाजूने घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांचा हा कट फसला आहे, असा रिपोर्ट अमेरिकन मीडिया आउटलेट वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केला आहे.

(हेही वाचा – Women’s Reservation Bill : न्यूझीलँड आणि युएईसारख्या देशांमध्येही महिलांना ५० टक्के आरक्षण; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याकडून महिला आरक्षणाचे समर्थन)

याविषयी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानिया जोली यांनी स्वतः याची कबुली दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जस्टिन ट्रुडो यांनी हा मुद्दा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे मांडला. कॅनडाने अमेरिकेसह आपल्या जवळच्या देशांना याप्रकरणी भारताचा निषेध करण्याचे आवाहन केले होते, परंतु त्यांनी नकार दिला. (Khalistan In Canada)

अमेरिकेला भारतासोबतचे संबंध बिघडवायचे नाहीत

भारत, अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील संबंधांवर बारकाईने लक्ष ठेवणारे विल्सन सेंटरचे दक्षिण आशिया विश्लेषक मायकेल कुगेलमन यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर आपले मत व्यक्त केले आहे. ट्रुडो यांच्या बालिश कृतींमुळे बायडेन प्रशासनाची कोंडी झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत हा अमेरिकेचा सामरिक भागीदार असून चीनला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिकेला भारताची सर्वाधिक गरज असल्याने या मुद्द्यावर अमेरिका कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कॅनडा हा अमेरिकेचा मित्र देश असला, तरी अमेरिकेला भारतासोबतचे संबंध बिघडवायचे नाहीत. (Khalistan In Canada)

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज म्हणाले – शांत व्हा

कॅनडातून एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ऑस्ट्रेलियानेही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात होती. पत्रकारांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना या प्रकरणी प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केले होते. प्रत्युत्तरात अल्बानीज यांनी पत्रकाराला शांत राहण्यास सांगितले. (Khalistan In Canada)

अलीकडेच भारतात झालेल्या G-20 परिषदेत, जो बायडेनसह सर्व जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींचे जबरदस्त बॉन्डिंग दिसले. मात्र, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो या जागतिक कार्यक्रमात एकाकी पडले. जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली तेव्हा पंतप्रधान मोदींनी कॅनडात सुरू असलेल्या भारतविरोधी कारवायांचा मुद्दा उपस्थित केला. खलिस्तानी कारवायांवर भर देत पंतप्रधान मोदींनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. जी-20 परिषदेत भारताने कॅनडासोबत भारताविरुद्ध सुरू असलेल्या कटाचा मुद्दा उचलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही भारत सरकारने खलिस्तान समर्थक चळवळीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या वर्षीही भारताने कॅनडा आणि ब्रिटनसह अनेक पाश्चिमात्य देशांना खलिस्तान समर्थकांवर कारवाई करण्याचे आवाहन केले होते. (Khalistan In Canada)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.