ऐन सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य नाही. (Onion Auction) येत्या 26 तारखेला व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते, मात्र लिलाव बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई करणार आहे. या कारवाईसाठी पणन आयुक्त, सहकार आयुक्त तसेच नाशिक जिल्हाधिकारी यांना तशा सूचना केल्या आहेत, असे आदेश पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्री सत्तार हे नाशिकच्या येवल्यात एका खासगी कामासाठी आलेले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कांद्यावर निर्यातमूल्य आकारल्यानंतर त्याचा तोटा व्यापाऱ्यांना होत असल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमधील लिलाव आजपासून बेमुदत बंद ठेवले आहेत. या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे .
(हेही वाचा – VHP : विहिंपची महाराष्ट्र व गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा)
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्यांसंदर्भात तोडगा निघू शकला नसल्याने आजपासून कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. सणासुदीच्या काळात लिलाव बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे पणन आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सत्तारांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. (Onion Auction)
कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच कांद्याचे निर्यातमूल्य वाढवल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी सत्तारांनी लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Onion Auction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community