Women’s Reservation Bill : युपीएने कमकुवत विधेयक आणले; स्मृती इराणी यांचे सडेतोड उत्तर

145

विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयकावर (Women’s Reservation Bill) चर्चा सुरू आहे. दिग्गज नेते या विधेयकावर आपले मत मांडत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, अल्पसंख्यांक आरक्षणावरही भाष्य केले. ‘विरोधक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. ’काँग्रेसवर हल्लाबोल करताना भाजप नेत्या म्हणाल्या की, ‘त्यांच्याकडे सत्ता होती पण त्यांनी देशाला लुटले, अन्यथा ही घोषणा फार पूर्वीच झाली असती. यूपीए सरकारने कमकुवत विधेयक आणले होते.

विरोधक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. वस्तुस्थिती रेकॉर्डवर येणे महत्त्वाचे आहे. राज्यघटनेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, महिला आरक्षण विधेयकाद्वारे (Women’s Reservation Bill) लक्ष्मीने (देवी) घटनात्मक रूप धारण केले आहे. मातृशक्ती हे शासनाचे केंद्र असावे अशी पंतप्रधानांची इच्छा होती. महिला सक्षमीकरण हा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या. अनेक लोक श्रेय घेण्यासाठी येतात, सोनिया गांधी यांचे नाव न घेता स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. काही लोक हे विधेयक आमचे असल्याचे सांगत आहेत. आमच्यामुळे बिल आहे, असे काही लोक म्हणत आहेत. आरक्षण ही मोदींची 15 वर्षांची गॅरंटी आहे. बरेच लोक श्रेय घेण्यासाठी येतात. पंतप्रधानांसाठी महिला सक्षमीकरण ही केवळ योजना नाही. 2014 पासून ते महिलांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी काम केले. अल्पसंख्याकांनाही आरक्षण द्यावे, अशी मागणी काही लोक करत आहेत, मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असे घटनेत म्हटले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा Khalistan In Canada : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा भारतविरोधी कट फसला; काय आहे वॉशिंग्टन पोस्टचा अहवाल…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.