भारतात झालेल्या G20 शिखर संमेलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आगामी प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिल्याची माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी दिली. G20 शिखर संमेलन पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय बातचीत झाली, त्यावेळी मोदींनी त्यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण दिले, असे एरिक गार्सेटी म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मोदींचे निमंत्रण स्वीकारून ते उपस्थित राहिले, तर ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ठरतील. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे सरकारने पहिल्या टर्म मधली सत्ता स्वीकारताच 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. ओबामा हे यूपीए राजवटीत पहिल्यांदा आणि मोदी राजवटीत दुसऱ्यांना भारताच्या दौऱ्यावर येणारे एकमेव राष्ट्राध्यक्ष ठरले होते. त्यांच्यानंतर बायडेन हे भारताच्या दौऱ्यावर दोनदा येणारे राष्ट्राध्यक्ष ठरतील.
G20 परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आले नव्हते. ते चीन मधल्या अंतर्गत राजकारणात गुंतले आहेत त्यांना एकाच वेळी आपणच नेमलेले संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रमंत्री हटवावे लागले आहेत त्याचवेळी अमेरिका आणि चीन यांच्यात आर्थिक संघर्ष सुरू आहे आणि भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन अध्यक्षांचा सलग दुसरा भारत दौरा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community