बुधवार, २० सप्टेंबर रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) (नारी शक्ती वंदन विधेयक) बहुमताने मंजूर झाले. ४५४ खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले. तर, केवळ दोघांनी विधेयकाविरोधात मतदान केले. आता गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत सादर केले जाईल. राज्यसभेत हे विधेयक पास झाल्यास नंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.
दरम्यान, यापूर्वी विधेयकावर चर्चेला उत्तर देताना अमित शाह म्हणाले, मी येथे १२८ व्या घटनादुरुस्तीबाबत बोलण्यासाठी उभा आहे. ते बोलू लागताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यावर शाह हसले आणि राहुल गांधींची नक्कल करत…डरो मत.. डरो मत…असे म्हणू लागले. यावेळी अमित शाह म्हणाले, महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) हे युग बदलणारे विधेयक आहे. भारतीय संसदेच्या इतिहासात उद्याचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन सभागृहात प्रथमच उदघाटन करण्यात आले. पहिल्यांदाच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विधेयकही मंजूर करण्यात आले. देशातील SC-ST साठी राखीव असलेल्या जागांपैकी ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. काही लोकांसाठी महिला सक्षमीकरण हा निवडणूक जिंकण्याचा मुद्दा असू शकतो, पण माझ्या पक्षासाठी आणि माझे नेते मोदी यांच्यासाठी हा मुद्दा राजकारणाचा नसून मान्यतेचा मुद्दा आहे. मोदींनीच भाजपमध्ये पक्षीय पदांवर महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. देशातील जनतेने सीएमनंतर पीएम मोदींना पंतप्रधान केले. ३० वर्षांनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले. त्यावेळी पीएम मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी मोदींच्या खात्यात जे काही पैसे होते, ते त्यांनी वर्ग ३ कर्मचारी आणि मुलींच्या खात्यात पाठवले होते.
Join Our WhatsApp Community