खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा (India vs Canada) यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारतीय गुप्तचर संघटनांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केल्यावर भारताने कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत.
अशातच आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने २० सप्टेंबर, बुधवारी कॅनडाशी (India vs Canada) संबंध असणाऱ्या ४३ दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी. केला. त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालमत्ता आणि संपत्तीबाबतची माहिती लोकांनी एनआयएला द्यावी, असं आवाहनही केलं. एनआयएने जारी केलेल्या यादीतील काही गँगस्टर हे तुरुंगात आहे तर काही फरार असून परदेशात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहेत. या यादीमध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा समावेश होता.
— NIA India (@NIA_India) September 20, 2023
(हेही वाचा – Khalistan In Canada : कॅनडाच्या गायकाचा मुंबईतील शो रद्द; कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचा परिणाम)
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून १२ गँगस्टरचे फोटो जारी (India vs Canada) करण्यात आले आहे. यामध्ये गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, अर्शद्वीप सिंह गिल, लखबीर सिंह लांडा, दिनेश गांधी, नीरज पंडित, गुरपिंदर सिंह, सुखदूल सिंह, गौरव पटयाल , सौरव आणि दलेर सिंह यांचे फोटो देखील जारी केले आहे. पंजाब पोलिसांनी गोल्डी ब्रार आणि दल्ला यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केले आहे.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या असेल किंवा सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न, लॉरेन्स बिष्णोई स्वतः बॉलिवूडमधल्या हिरोपेक्षा कमी नाही. पोलिसांच्या कस्टडीत असतानाही त्याचे काढले जाणारे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळोवेळी पोस्ट होत असतात . त्यासाठी त्याची टोळी काम करते आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बिष्णोई टोळीने पंजाब , हरियाणा , दिल्ली , उत्तर प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश , महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ६०० पेक्षा अधिक शार्प शूटरच जाळं विणल आहे. २८ वर्षाचा लॉरेन्स तिहार तुरुंगातून टोळीचा कारभार चालवतो. तुरुंगात कैद असताना त्याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तर रचलाच, शिवाय त्यानंतर व्यवस्थेच्या नावावर टिच्चून त्या हत्येची कबुली सोशल मीडियावरून स्वतःहून दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community