पुणे जिल्ह्यातील नगर-कल्याण महामार्गावर (Ahmednagar-Kalyan highway) भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पायी जाणाऱ्या तरुणीसह दुचाकीला जोरदार धडक दिली (Accident). या भीषण अपघाता मध्ये तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.जखमी झालेल्या दुचाकीवरील व्यक्तीला तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा भीषण अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरामध्ये घडला. ऐन गणेशोत्सवाच्या काळात अशी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून अपघातामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९ वर्ष) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५ वर्ष) अशी मृत महिलांची नावे आहेत. तर गीताराम नामदेव तांबे (वय ५२ वर्ष) असं जखमी दुचाकीस्वाराचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ऋतुजा डुंबरे ही रस्त्याने घरी चालत जात होती.त्याचवेळी गीताराम तांबे आणि त्यांची पत्नी सविता हे दोघे पती-पत्नी दुचाकीवरुन आळेफाट्याच्या दिशेने जात होते. अचानक भरधाव वेगात आलेल्या पिकअपने रस्त्याने चाललेल्या तरुणीसह आणि दुचाकीवरील पती-पत्नीला धडक दिली.
(हेही वाचा : Khalistan In Canada : कॅनडाच्या गायकाचा मुंबईतील शो रद्द; कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचा परिणाम)
या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पिकअप वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून फरार झाला. ओतूर पोलीस त्याचा शोध घेत आहे.अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातानंतर नगर-कल्याण महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community