Mark zuckerberg : मार्क झुकेरबर्ग यांनी केला भारतावर कौतुकांचा वर्षाव

मुंबईत आयोजित व्हॉट्सअॅप कार्यक्रमात बोलतना त्यांनी भारताचं कौतुक केलं.

161
Bloomberg Billionaires Index : श्रीमंतांच्या यादीत फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांची तिसऱ्या स्थानावर झेप

मार्क झुकेरबर्ग यांनी भारतावार कौतूकांचा वर्षावर केला आहे. त्यांनी भारताचा उल्लेख क जागतिक नेता असं केलं आहे. भारतीय लोक आणि कंपन्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आघाडीवर असल्याचं मत झुकेरबर्ग यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

व्हॉट्सअॅप आणि फेसबुक आता मेटा कंपनीचा भाग आहेत. याचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. मुंबईत आयोजित व्हॉट्सअॅप कार्यक्रमात बोलतना त्यांनी भारताचं कौतुक केलं. WhatsApp ने PayU आणि Razorpay सोबत हातमिळवणी करण्याची घोषणा केली. यामुळं व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI अॅप इत्यादीद्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअॅपवर व्यवसायांसाठी व्हेरिफिकेशन सुविधा सुरू केली आहे. अनेक भारतीय कंपन्या त्यांच्याकडे अशा सुविधेची मागणी करत आहेत.

(हेही वाचा :India vs Canada : एनआयएकडून कॅनडाशी संबंधित ४३ दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी)

या कार्यक्रमादरम्यान मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअॅप फ्लोज नावाचे एक नवीन फीचर देखील सादर केले आहे. हे वैशिष्ट्य कंपन्यांना चॅट कस्टमाइझ आणि वैयक्तिकृत करण्यास अनुमती देईल. झुकेरबर्गने एक उदाहरण देऊन हे वैशिष्ट्य स्पष्ट केले. समजा एखादी बँक असेल, तर या फीचरद्वारे ग्राहकांना बँक खाते उघडण्याची किंवा चॅटद्वारेच तिची इतर सेवा मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. त्याचप्रमाणे विमान कंपन्या तिकीट बुक करण्याची सुविधा देऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना चॅट न सोडता या सेवेचा लाभ घेता येणार आहे. भारतातील लोक आणि भारतीय कंपन्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आघाडीवर असल्याचे मत मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.