आमदार अपात्रता प्रकरणाबाबत (MLA Disqualification Case) मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार आहेत. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असे निर्देश दिले होते. २० सप्टेंबर, बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिवसभरात कायदेतज्ज्ञ आणि विधीमंडळाच्या सचिवालयाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली, त्यानंतर दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीसा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरुन एकंदरीत आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या कामाला गती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा – India vs Canada : एनआयएकडून कॅनडाशी संबंधित ४३ दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी)
दरम्यान, आमदार अपात्र याचिकांवरील सुनावणीला (MLA Disqualification Case) विलंब होत असल्याची तक्रार ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती. यासंदर्भात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, याचिकेवर 3 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याची माहितीही सर्वोच्च न्यायालयानं दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community