MMRDA : मोनोरेलने घ्या गणेशदर्शन ,एमएमआरडीएचे नागरिकांना आवाहन

तोट्यातील मार्गिकेला उभारी देण्यासाठी MMRDA चे प्रयत्न सुरु

188
Mono Service: वडाळा स्थानक-चेंबूरदरम्यान रविवारी सकाळी मोनो सेवा बंद राहणार, कारण? वाचा सविस्तर....

सध्या दरमहा २५ कोटी रुपयांनी तोट्यात असलेल्या मोनोरेलला गणेशोत्सवात काळात तरी उभारी मिळावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) प्रयत्न सुरू केले आहेत. याअंतर्गत मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या परिसरातून धावणाऱ्या मोनोरेलने प्रवास करा व गणरायाचे दर्शन घ्या, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

एकेकाळी जगातील अत्यंत वेगाने वाढणारे प्रचंड लोकसंख्येचे शहर आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगर व आजूबाजूच्या उपनगरांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. वास्तविक पाहता शहरात अनेक मोठे रस्ते महामार्ग उड्डाणपूल त्याचप्रमाणे लोकल रेल्वे सेवा इतकेच नव्हे तर मोनो आणि मेट्रो रेल्वे सेवा आहे, तरीही ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे, त्यातच आता मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या मार्फत सुरू असलेल्या मेट्रो व मोनो रेल सेवा या संयुक्तपणे मासिक रुमारे २५ ते ३० रुपये कोटी रुपयांच्या तोट्यात आहेत.

देशातील पहिली मोनोरेल मुंबईत २०१४मध्ये सुरू झाली. चेंबूर ते वडाळा व वडाळा ते जेकब सर्कल, अशी दोन टप्प्यांत सुरू झालेली ही मार्गिका सुरुवातीपासून तोट्यात आहे. मात्र या मार्गिकेवरील बहुतांश स्थानके ही मुंबईच्या प्रसिद्ध अशा गणेश मंडळांच्या भोवती आहेत. त्यामुळेच आता यंदाच्या गणेशोत्सवाचा सर्वत्र उत्साह असताना एमएमआरडीएने त्यानिमित्ताने मोनोरेलचे प्रवासी वाढावे, यासाठी प्रयत्न करायचे ठरवले आहे.

एमएमआरडीए ने काय केले आहे ट्विट
या सर्व पार्श्वभूमीवर ‘एमएमआरडीए’ने सर्वांना गणेशोत्सवाच्या समाजमाध्यमांवर शुभेच्छा देत आवाहन केले आहे. ‘मोनोरेल ही असंख्य सण व या सणांशी जोडलेल्या भावनांची साक्षीदार होत आपल्या परिने या सण व उत्सवात भाग घेते’, असे ‘ट्विटर वर ‘एमएमआरडीए’ने म्हटले आहे.
(हेही वाचा : Mark zuckerberg : मार्क झुकेरबर्ग यांनी केला भारतावर कौतुकांचा वर्षाव)

या मार्गावर करा मोनोरेलचा वापर
-मोनोरेलची मार्गिका जिथून सुरू होते तो चेंबूरचा परिसर टिळकनगरच्या प्रसिद्ध गणपतीपासून जवळ आहे. त्यानंतर ही मार्गिका अँटॉप हिलच्या पुढे आचार्य अत्रेनगर स्थानकावर पोहोचते. तिथून किंग्स सर्कलचा जीएसबी गणपती थोड्या अंतरावर आहे.
-दादर पूर्व स्थानक हे तांत्रिकदृष्ट्या वडाळ्यात आहे. वडाळ्यातील अनेक मोठे व जुने सार्वजनिक गणपती याच भागात आहेत. तिथून ही मार्गिका पुढे नायगावला व त्यानंतर लोअर परळ, चिंचपोकळीमार्गे जेकब सर्कलला पोहोचते.
-नायगाव-लोअर परळ व चिंचपोकळी या संपूर्ण भाग लालबागच्या राजापासून ते गणेशगल्ली, तेजुकाया, चिंचपोकळीचा चिंतामणी या सर्व प्रसिद्ध व लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सवापासून पायी अंतरावर आहेत.
-परळ येथील मिंट कॉलनी स्थानकाशेजारी इच्छापूर्ती गणपती मंदिर असून तेथील गणेशोत्सवही प्रसिद्ध आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.