येत्या 25 ते 27 सप्टेंबर या कालावधीत भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी यांनी संयुक्तपणे, (Indo-Pacific Ocean Council) 35 देशांचे लष्करप्रमुख आणि प्रतिनिधींची तीन दिवसीय परिषद आयोजित केली आहे. ही परिषद नवी दिल्ली येथे होणार असून यामध्ये 13 व्या आयपीएसीसी, 47 व्या आयपीएएमएस आणि 9 व्या एसईएलएफ यांचाही समावेश असणार आहे.
“शांततेसाठी सहयोग : हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील शाश्वत शांतता आणि स्थैर्य”, (Indo-Pacific Ocean Council) ही या मंचाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही परिषद प्रामुख्याने हिंद प्रशांत महासागर प्रदेशातील देशांचे लष्कर प्रमुख आणि पायदळातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना, सुरक्षा आणि समकालीन मुद्द्यांवर विचार आणि दृष्टीकोन याची देवाणघेवाण करण्याची संधी देईल. तटीय भागीदारांमधील परस्पर सामंजस्य, संवाद आणि मैत्री याद्वारे हिंद प्रशांत महासागर प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे हा या मंचाचा प्रमुख प्रयत्न असेल.
(हेही वाचा – India vs Canada : भारत तोडणाऱ्या खलिस्तानी गायकला विराट कोहलीने केले अनफॉलो)
या परिषदेच्या तीन टप्प्यांमध्ये पूर्ण सत्रे आणि अनौपचारिक बैठका होणार आहेत.
लष्कर प्रमुखांच्या परिषदेत प्रदेशात (Indo-Pacific Ocean Council) शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सर्व लाभधारकांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी परस्पर हिताच्या आणि सहकार्याच्या क्षेत्रांवर चर्चा केली जाईल.
या कार्यक्रमात (Indo-Pacific Ocean Council) आत्मनिर्भर भारत उपकरणांचे प्रदर्शनही आयोजित केले जाईल. परिषदेत सहभागी प्रतिनिधींना राजधानी दिल्ली मधील काही वारसा स्थळांना भेट देऊन भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेची झलक पाहायला मिळेल. –‘आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन’ ने राबविलेल्या विविध उपक्रमांचीही ते माहिती घेतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community