Maharashtra Pollution : राज्यातील तब्बल १९ शहरांमध्ये वायू प्रदूषण कायम

महाराष्ट्रावर कोट्यावधी रुपये खर्च वाया

218
Pollution : बेकरींमुळे वाढतेय प्रदूषण, अभ्यास अहवालात हे सत्य आले समोर!

वाढती खासगी वाहने, कंपन्या या सर्वांमुळे वायू प्रदूषण वाढत चालले आहे. वायू प्रदूषण वाढल्याने राज्यातील अनेक व्यक्तींना मोकळा श्वास घेणं कठीण झाले आहे .तसेच श्वसानाशी संबंधित आजारांचे आणि रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम राबवला जातोय. यामध्ये महाराष्ट्रावर कोट्यावधी रुपये खर्च केल्यानंतरही हवेच्या शुद्धतेची पातळी (Maharashtra Pollution) वाढलेली नाही
देशभरात हवेचा दर घसरल्याने शुद्ध हवेसाठी मागील पाच वर्षांत नऊ हजार ३९१ कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. यामध्ये महाराष्ट्रासाठी एक हजार ६८४ कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र राज्यातील तब्बल १९ शहरांमध्ये वायू प्रदूषण कायम आहे. वायू प्रदूषणाची टक्केवारी देखील समोर आलीये.

राज्यातील कोणत्या शहरात किती प्रदूषण, पार्टिक्युलेट मॅटर १० ची वार्षिक सरासरी नुसार,

वसई विरार – १५५

बदलापूर – १४३

उल्हासगर- १२८

चंद्रपूर – १२१

ग्रेटर मुंबई – ११६

ठाणे – ११५

नागपूर- ९७

नवी मुंबई – १०२

छत्रपती संभाजीनगर – १०७

पुणे – ९६

जालना – ९३

साल २०१७ मध्ये संपूर्ण देशभरात राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पीएम १० ची मात्र महाराष्ट्रातील १९ शहरांमध्ये सर्वाधिक आहे. २०२४ पर्यंत हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
(हेही वाचा : Indo-Pacific Ocean Council : हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील 35 देशांच्या लष्करप्रमुखांच्या परिषदेचे आयोजन)

पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे काय?

हवेतील प्रदूषण म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर होय. हवेत असलेली धूळ, धूर, मातीचे बारीक कण या सर्वांच्या मिश्रणात पार्टिक्युलेट मॅटर तयार होते. यामुळे श्वसनाच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात. श्वसनाच्या आजारांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.