भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शेफाली वर्माची शानदार ६७ धावांची ऐतिहासिक खेळी आणि जेमिमा आणि रिचा यांच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने थेट सेमीफायनल गाठली आहे.
हांगझोऊ येथे भारत आणि मलेशिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात मुसळधार पाऊस पाडला, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १५ षटकांत १७३ धावा केल्या. मलेशियाच्या डावातील फक्त २ चेंडू टाकले गेले आणि पुन्हा पाऊस सुरु झाला, त्यामुळे सामना रद्द झाला. पण भारताने मात्र त्यांच्या रँकिंगमुळे सेमी फायनल गाठली.
India qualified for the Semi-final of the Asian Games in Cricket.
– Go for the Gold…..🇮🇳 pic.twitter.com/H1KhYtuP70
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2023
(हेही वाचा – Revenue Department : बदलीनंतर रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचा दणका)
सुरुवातीला मलेशियाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावातही पावसामुळे उशीर झाला आणि भारताने ५.४ षटकांत १ बाद ६० अशी मजल मारली. स्मृती मानधना (२७) ही पावसाच्या विलंबापूर्वीच त्या षटकात बाद झाली. पहिला डाव सकाळी ८:१५ वाजता पुन्हा सुरू झाला आणि सामना १५ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारताने १५ षटकात २ गडी गमावून १७३ धावा केल्या. शेवटच्या षटकात ऋचा घोषने पॉवर हिटिंग करताना २० धावा केल्या. अशाप्रकारे मलेशियासमोर १५ षटकांत १७४ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधना हिने १६ चेंडूत २७ आणि शेफाली वर्माने ३९ चेंडूत ६७ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्जने २९ चेंडूंत नाबाद ४७ धावा केल्या तर रिचा घोषने सात चेंडूंत २१ धावांची तुफानी नाबाद खेळी केली.
भारतीय संघ :
स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, कनिका आहुजा, रिचा घोष, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, मिन्नू मणी, राजेश्वरी गायकवाड.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community