रेल्वे (Railway) अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना, नातेवाईकांना ५० हजार रुपयांची रक्कम भरपाई म्हणून रेल्वेकडून देण्यात येत होती. तर गंभीर जखमींना २५ हजार देण्यात येत होते. मात्र, २०१२ नंतर तब्बल ११ वर्षांनी भरपाईच्या रकमेत दहापटीने वाढ करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५० हजारांवरून पाच लाख रुपये आणि गंभीर जखमींना २५ हजारांवरून अडीच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
किरकोळ दुखापत झाल्यास मदतीची रक्कम ५ हजार रुपयांवरून ५०हजार रुपये करण्यात आली आहे. मदतीच्या रकमेशिवाय अपघातानंतर प्रवाशांचा रुग्णालयाचा खर्चही विभाग उचलणार आहे. ३०दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला दुखापत किती गंभीर आहे यावर अवलंबून ३००० रुपये, १५०० रुपये आणि ७५० रुपये प्रतिदिन खर्च होतील.
११ वर्षांत रेल्वे अपघातात मृत्यू आणि गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे कुटुंबीय तुटपुंज्या आर्थिक भरपाईने घर सावरण्याचे प्रयत्न करत होते. भरपाईची रक्कम मिळण्यासाठीदेखील त्यांना अनेकदा रेल्वे कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत होते. मात्र, रेल्वेमंडळाने नुकसानभरपाईची रक्कम जवळपास दहापटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत रेल्वेमंडळाने १८ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेमधील सर्व महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
११ वर्षांत रेल्वे अपघातात मृत्यू आणि गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे कुटुंबीय तुटपुंज्या आर्थिक भरपाईने घर सावरण्याचे प्रयत्न करत होते. रेल्वेमंडळाने नुकसानभरपाईची रक्कम जवळपास दहापटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत रेल्वेमंडळाने १८ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेमधील सर्व महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. रेल्वे बोर्डाने १८ सप्टेंबर २०२३ रोजी एक परिपत्रक जारी करून मदत रकमेत वाढ करण्यात आली आहे. या तारखेपासून नवीन मदत रक्कम लागू होईल. यापूर्वी ही रक्कम २०१२-२०१३ मध्ये सुधारित करण्यात आली होती.
(हेही वाचा :Deccan Odyssey : डेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात धावण्यास सज्ज…..!)
या प्रकरणांमध्ये कोणतीही अनुग्रह रक्कम दिली जाणार नाही
मानवरहित लेव्हल क्रॉसिंगवर अपघात झालेल्यांना, विनापरवानगी आत घुसलेल्यांना आणि रेल्वेच्या वरच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांना कोणतीही अनुग्रह रक्कम दिली जाणार नाही, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही पहा –