Khichadi Scam Case : खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकर यांची ६ तास चौकशी

अमोल कीर्तिकर यांची खिचडी घोटाळ्यातील भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही

186
Amol Kirtikar ED Summons: अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीकडून पुन्हा समन्स
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने खिचडी घोटाळा प्रकरणी उबाठा शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांची सहा तास चौकशी केली.मात्र अमोल कीर्तिकर यांची खिचडी घोटाळ्यातील भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. अमोल कीर्तिकर हे आमदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या गटातील अमोल कीर्तीकर हे बुधवारी तपास पथकासमोर स्वत:ला हजर झाले होते. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेने  शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि इतर सहा विरुद्ध ६.३७ कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात महानगर पालिकेने कोविड-१९ साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांना ‘खिचडी’ वाटपाचे कंत्राट देताना आर्थिक घोटाळा  केल्याचा आरोप आहे . मुंबई पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची प्राथमिक चौकशी केली होती.

खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा कथित कोवीड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तीकरांची बुधवारी सहा तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाकडून सरकारवर मोठी टीका करण्यात येत आहे.

(हेही वाचा-Chandrayan -3 : चंद्रयान -3 पुन्हा जागे होण्याची अपेक्षा)

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कोवीड काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. महानगरपालिकेचा १०० कोटींचा कोवीड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब स्थलांतरित कामगारांसाठी ज्यांचे स्वतःचे मुंबईत घर नाही, त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. मात्र या कंत्राटात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

कामगारांना जेवण देण्यासाठी भारत सरकारचेही समर्थन होते. या स्थलांतरित कामगारांना खिचड़ी बनवण्याचं कंत्राट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेने दिलं होतं. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असा मुंबई महानगरपालिकेने दावा केला आहे. मात्र, यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याचीच चौकशी सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेने खिचडी घोटाळ्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, राजीव साळुंखे यांच्यासह काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं अमोल कीर्तिकर यांना समन्स देऊन बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. याआधी दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी राजकीय चर्चा रंगली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.