सध्या संपूर्ण जगात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मुलाचं ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या मुलाचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. हे अकाऊंट हॅक झाल्याची कोणीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही, या अकाऊंटवरून ज्या पद्धतीने पोस्ट व्हायरल होत आहेत, त्यावरून निश्चितच हे अकाऊंट हॅक झाल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीचीच धक्कादायक पोस्ट व्हायरल झाल्याने अधिकच खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या चिरंजीवाच्या या अकाऊंटवरून अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यात शिव्याही व्हायरल केल्या जात आहेत. धक्कादायक म्हणजे विद्यमान राष्ट्रपती जो बायडन यांना शिव्या देणाऱ्या पोस्ट ट्विट केल्या जात आहे. एवढंच कशाला एलन मस्क यांच्या नावानेही आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतही सध्या या पोस्टचीच चर्चा होत आहे.
(हेही वाचा – Railway : रेल्वेने अपघात नुकसानभरपाई दहापट वाढवली)
यातील एक पोस्ट तर अधिकच धक्कादायक आहे. “मला तुम्हाला सांगायला अत्यंत दु:ख होत आहे की, माझे वडील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे जग सोडून गेले आहेत. तेच जिवंत नसल्याने आता 2024च्या राष्ट्रपती निवडणुकीत मी भाग घेत आहे, असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या नावाने व्हायरल होत आहे.
हॅकर्स एवढ्यावरच थांबलेले नाहीत. तर त्यांनी दोन देशांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्नही केला आहे. नॉर्थ कोरियाला आम्ही नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी देणारी पोस्टही व्हायरल होत आहे. या अकाऊंटवरून ज्या पद्धतीने पोस्ट केल्या जात आहेत आणि ज्या प्रमाणात केल्या जात आहेत, त्यावरून हे अकाऊंट हॅक केल्याचं सांगितलं जात आहे.
हे सर्व करणारा कोण आहे? त्याचा हेतू काय आहे? ट्रम्प यांच्या चिरंजीवाचं अकाऊंट हॅक करून त्याला काय मिळणार आहे? या सर्व प्रश्नांचा गुंता वाढला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community