शिवसेनेचे (उबाठा) माजी नगरसेवक सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ५३ वर्षीय महिला वकिल निलिमा चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. (Sudhir More Suicide) या प्रकरणात चव्हाण यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – Chandrayan -3 : चंद्रयान -3 पुन्हा जागे होण्याची अपेक्षा)
मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुधीर मोरे (वय ६२) यांनी ३१ ऑगस्ट रोजी रात्री घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनखाली आत्महत्या केली होती. सुधीर मोरे यांच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत निलिमा चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Sudhir More Suicide)
चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ६ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर चव्हाण यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निलिमा चव्हाण यांच्या जामीन अर्जावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होती. दरम्यान उच्च न्यायालयाने निलिमा चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला. मोरे यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी निलिमा चव्हाण यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Sudhir More Suicide)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community