Rape In Mumbai : मुंबईत धावत्या टॅक्सीत १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार 

दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत लैंगिक अत्याचार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

155
Rape In Mumbai : मुंबईत धावत्या टॅक्सीत १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार 
Rape In Mumbai : मुंबईत धावत्या टॅक्सीत १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार 
मुंबई –
मलबार हिल येथे राहणाऱ्या १४ वर्षीय मतिमंद मुलीवर भरदिवसा धावत्या टॅक्सीत दोन जणांनी लैगिंग अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी  टॅक्सी चालकासह दोन जणांना अटक केली असून दोघाविरुद्ध अपहरण, सामूहिक अत्याचार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पांडे आणि सलमान खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून प्रकाश पांडे हा टॅक्सी चालक असून खान हा त्याचा मित्र आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांचे वयोगट २५ ते २६ असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे तिच्या कुटुंबीयांशी भांडण झाले, त्यानंतर तिने मालाडच्या मालवणी येथे असलेल्या तिच्या चुलत बहिणीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दुपारी ती दादर रेल्वे स्थानकावर पोहचली तेथून तीने  मालाडला जाण्याचा निर्णय घेतला. तेथे प्रकाश पांडे या टॅक्सी चालकाने तीला मालाडला सोडण्याचे सांगून टॅक्सीत बसवले. काही अंतरावर पांडे यांनी टॅक्सी थांबवुन सलमान खान याला टॅक्सी बसवले, खान हा पीडित मुलीच्या शेजारी येऊन बसला. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे चिंतेत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी मलबार हिल पोलिस ठाणे गाठून ती अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केल्याने ही मुलगी मालाड परिसरात नातेवाईकाच्या घरी असल्याचे निष्पन्न झाले.
मुलीला परत आणण्यासाठी एक टीम तिथे पाठवण्यात आली होती आणि ती बेपत्ता झाल्यानंतर सहा ते सात तासांत आम्ही असे करू शकलो. मात्र, मालाडला जाताना तिच्यासोबत काय घडले हे मुलीने उघड केल्यावर परिस्थिती गंभीर झाली असे एका  पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.पोलिसानी तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार  ती ज्या टॅक्सीत बसली होती, त्या टॅक्सीत तिच्या मागच्या सीटवर येउन बसलेल्या प्रवाशाने आणि टॅक्सी चालकाने तिचासोबत अश्लील चाळे करीत तिच्यावर धावत्या टॅक्सीत लैगिग अत्याचार केला.
पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता पीडित ज्या टॅक्सीत बसली त्याचा क्रमाक पोलिसांना मिळून आला. त्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी टॅक्सीचा शोध घेऊन टॅक्सी चालक पांडे आणि त्याचा सहकारी खान या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसानी दिली. या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत लैंगिक अत्याचार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.