कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या राजकीय मतपेटीसाठी खलिस्तान्यांना खुश करण्यासाठी भारतावर गंभीर आरोप केले. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. आता भारताने कॅनडातील नागरिकांना भारताचा व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅनडात दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो असा थेट हल्लाबोल केला.
काय म्हणाले बाग?
भारताने याआधी कॅनडातील दहशतवादी कारवायांबाबत कॅनडाला माहिती दिली आहे. परंतु त्यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही. तसेच कॅनडानेही भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर केली नाही. कॅनडा (Canada) हे दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. कॅनडाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विचार करण्याची गरज आहे.
कॅनडाची (Canada) व्हिसा सेवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील, असे बाग म्हणाले. सर्वांना कॅनडामधील आमच्या उच्चायुक्तालये आणि वाणिज्य दूतावासांना भेडसावणाऱ्या धोक्यांची आणि सुरक्षा धोक्यांची जाणीव आहे. यामुळे त्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आमचे उच्चायुक्त आणि वाणिज्य दूतावास तात्पुरते बंद आहेत, कारण प्रभावीपणे कार्य करण्यास ते अक्षम आहेत. आम्ही नियमितपणे याचे पुनरावलोकन करू, असेही बाग म्हणाले.
Join Our WhatsApp Community