Burqa Ban : स्वित्झर्लंडमध्ये बुरखा किंवा निकाब घालण्यावर बंदी; कोणकोणत्या देशांमध्ये आहे बंदी?

स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्याबाबत झालेल्या मतदानात १५१ खासदारांनी याच्या बाजूने मतदान केले, तर २९ खासदारांनी विरोधात मतदान केले.

159
स्वित्झर्लंडमध्ये बुरखा किंवा निकाब (Burqa Ban) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने 20 सप्टेंबर 2023 रोजी त्यास मान्यता दिली आहे. यानुसार स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी नाक, तोंड आणि डोळे झाकणारा निकाब किंवा बुरखा घालणे बेकायदेशीर मानले जाईल. असे केल्यास अंदाजे ९२ हजार रुपये दंड आकारला जाईल. स्वित्झर्लंडने बुरखा किंवा निकाबवर बंदी घातलेल्या युरोपियन देशांमध्ये सामील झाले आहे. यापूर्वी फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया आणि नेदरलँड या देशांनी यावर बंदी घातली आहे. युरोपबाहेर चीन आणि श्रीलंकेतही बुरख्यावर बंदी आहे.
हेही पहा –

स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बुरखा आणि निकाबवर (Burqa Ban) बंदी घालण्याबाबत झालेल्या मतदानात १५१ खासदारांनी याच्या बाजूने मतदान केले, तर २९ खासदारांनी विरोधात मतदान केले. हा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या वरिष्ठ सभागृहाने यापूर्वीच स्वीकारला आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये सर्वाधिक निर्णय जनमताने घेतले जातात. २०२१ मध्ये देशभरात सार्वजनिक ठिकाणी आणि खाजगी इमारतींमध्ये बुरख्यावर बंदी घालण्याबाबत सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतामध्ये ५१ % लोकांनी बुरख्यावरील बंदीच्या बाजूने मतदान केले.
स्वित्झर्लंडमधील एगरकिनझेन समितीने सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि निकाबवर (Burqa Ban) बंदी घालण्यासाठी २०१६ मध्ये प्रयत्न सुरू केले. त्यानंतर २०२१ मध्ये मतदान झाले. स्वित्झर्लंडच्या राष्ट्रवादी स्विस पक्षाने कट्टरपंथी इस्लामविरुद्ध मोठा विजय म्हणून सार्वमताच्या निकालांचे स्वागत केले. संसदेने संमत केलेल्या कायद्याचा हेतू असा आहे की, कोणतीही स्त्री किंवा पुरुष चेहरा झाकून आपली ओळख लपवू नये. स्वित्झर्लंडची एकूण लोकसंख्या अंदाजे ८९ लाख आहे. त्यात 62.6% ख्रिश्चन आणि 5.4% मुस्लिम आहेत. देशात जवळपास ३०% लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.