Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलकांचा पोलीस ठाणे आणि कोर्टात घुसण्याचा प्रयत्न

134
Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलकांचा पोलीस ठाणे आणि कोर्टात घुसण्याचा प्रयत्न
Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलकांचा पोलीस ठाणे आणि कोर्टात घुसण्याचा प्रयत्न

१६ सप्टेंबरला अटक करण्यात आलेल्या ५ तरुणांची बिनशर्त सुटका करण्याच्या मागणीसाठी मणिपूरमध्ये २१ सप्टेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. (Manipur Violence) या वेळी आंदोलकांनी पोलीस ठाणे आणि कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी मणिपूर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने संध्याकाळी 5 वाजल्यापासून इंफाळच्या दोन्ही जिल्ह्यांतील कर्फ्यू पुन्हा कडक केला आहे. अटक करण्यात आलेले तरुण स्वयंसेवक म्हणून मैतेई गावांचे रक्षण करत होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Sweepers : सफाई कामगारांसाठी सुमारे २४ लाखांची हजेरी चौकी)

६ स्थानिक क्लब आणि मीरा पाबीसच्या आवाहनानंतर शेकडो आंदोलक फलक घेऊन रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी केली. या लोकांनी इंफाळमधील पोरोम्पॅट पोलीस स्टेशन आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामेई पोलीस  स्टेशन आणि क्वाकिथेल पोलिस चौकीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या जमावाने इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील मायांग इंफाळ पोलीस ठाण्यात आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यातील आंद्रो पोलीस ठाण्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ऑल लँगथाबल केंद्र युनायटेड क्लब्स कोऑर्डिनेटिंग कमिटीचे अध्यक्ष युमनम हिटलर म्हणाले की, अटक केलेल्या ५ तरुणांना सोडण्यासाठी सरकार कोणतीही पावले उचलत नाही. यानंतर स्वेच्छा जनआंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Manipur Violence)

पोलीस आणि आरएएफच्या जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या. पोरोम्पत येथील एका आंदोलकाने सांगितले की, “आमच्याकडे अटकेशिवाय पर्याय उरला नाही कारण सरकार 5 युवकांना (स्वयंसेवक) सोडत नाही. जर अशा गावांतील स्वयंसेवकांना अटक केली गेली, तर मेईतेई गावातील कुकी झोस अतिरेक्यांशी लढतील. संरक्षण कोण करणार ? (Manipur Violence)

का करण्यात आली होती ५ तरुणांना अटक

16 सप्टेंबर रोजी मणिपूर पोलिसांनी अत्याधुनिक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आणि पोलिसांचा गणवेश परिधान केल्याप्रकरणी ५ जणांना अटक केली होती. हे तरुण स्वयंसेवक बनून मैतेई गावांचे रक्षण करत होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ५ जणांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना पोलीस  कोठडी सुनावण्यात आली होती.

कर्फ्यू शिथिलता रद्द

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संध्याकाळी इंफाळच्या दोन्ही जिल्ह्यांतील कर्फ्यूमधील शिथिलता रद्द केली. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आलेला संचारबंदी सायंकाळी 5 वाजल्यापासून मागे घेण्यात आला आहे. सर्वच भागात सर्वसामान्यांच्या हालचालींवर बंदी लागू करण्यात आली आहे. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातही असेच आदेश लागू करण्यात आले आहेत. (Manipur Violence)

मणिपूरच्या कांगपोकपी येथे 2 सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले. अज्ञात हल्लेखोरांनी कांगगुई भागातील इरेंग आणि करम वाफेई गावांदरम्यान सकाळी 8.20 च्या सुमारास ग्रामस्थांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात तिघे ठार झाले. मणिपूरमध्ये 3 मे पासून कुकी आणि मेतेई समुदायांमधील सुरू असलेल्या वादात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.