बऱ्याच जणांना जेवणात लोणचे लागतेच ! (Pickle In Meal) तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला, आज पराठा आहे, अशी अनेक करणे असतात. काही जणांना रोज वेगवेगळ्या पद्धतीचे लोणचे लागते. लोणचे कधीतरी खाल्ले, तर जेवणाची चव वाढवते. रोज खाल्ले तर मात्र ते आरोग्याला अपाय करू शकतात. लोणचे जास्त खाऊ नये असे, अनेकदा सांगितले जाते; कारण त्यात मोठ्या प्रमाणात मीठ वापरले जाते. त्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू शकते. जास्त प्रमाणात लोणचं खाल्ल्यास पोट फुगणे, उच्च रक्तदाब आणि किडनीच्या आजाराशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. लोणच्यामध्ये असलेलं सोडियम शरीरातील कॅल्शियम कमी करू शकते, त्यामुळे हाडे आकुंचन पावतात.
(हेही वाचा – Vande Bharat Express : पंतप्रधान मोदी नवीन ९ वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार)
काय होऊ शकतात लोणच्याचे दुष्परिणाम
१. अति प्रमाणात लोणचं खाणाऱ्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवते, त्यामुळे जास्त लोणचे खाणे टाळावे. लोणचं दीर्घकाळ साठवले जाते आणि त्यामध्ये भरपूर तेल वापरलं जातं. त्याताल तेलामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. (Pickle In Meal)
२. बीपीच्या रुग्णांसाठी लोणचं खाणे विषासमान आहे. लोणच्यामध्ये असलेलं मीठ बीपीच्या रुग्णांच्या शरीरात सोडियमचं प्रमाण वाढवते, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. त्याच वेळी, रक्तवाहिन्यांचं देखील नुकसान होऊ शकते.
३. लोणचं जास्त खाल्ल्याने सूज येऊ शकते. कारण लोणचं जास्त काळ ताजं ठेवण्यासाठी त्यात मीठ आणि तेल मिसळून ते जास्त काळ टिकवले जाते. जास्त लोणचं खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या देखील होऊ शकते आणि चयापचय आणि यूरिक ऍसिडच्या समस्या देखील वाढू शकतात. (Pickle In Meal)
४. लोणच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असल्याने हाडं कमकुवत होतात, त्यामुळे शरीरात कॅल्शियमची समस्या सुरू होते. यामुळेच जास्त आंबट पदार्थ खाणाऱ्यांना सांधेदुखीचा त्रास होतो. लोणच्याचा जास्त वापर केल्याने आपल्या पोटातील आम्लता वाढते. तसंच त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस, करपट ढेकर येणं या सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Pickle In Meal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community