Women’s Reservation Bill : नारी शक्ती वंदन विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर

126
Jal Jeevan Mission च्या कामांची केंद्रीय टास्क फोर्सकडून समीक्षा; अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर
महिलांना लोकसभा, विधानसभा ३३ टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयक हे संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चेला आणण्यात आले. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. त्यानंतर गुरुवार, २१ सप्टेंबर रोजी या विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली. रात्री १० वाजता हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधेयक राज्यसभेत एकमताने अर्थात २१५ मतांनी मंजूर झाले.
रात्री १० वाजेपर्यंत यावर सर्व सदस्यांनी चर्चा केली, त्यानंतर हे विधेयक एकमताने मंजूर झाले. यावेळी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यामध्ये अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांना आरक्षण देण्याची मागणी करत या विधेयकाची अंमलबजावणी कधी करणार याची निश्चित तारीख दाखवावी, अशी मागणी खरगे यांनी केली.
कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधेयक अंमलात निश्चित आणतील, ते सांगतात तशी कृती करतात, असे ठामपणे सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या विधेयकाच्या माध्यमातून जे स्पिरिट निर्माण झाले ते देशभरात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचेल. या विधेयकाप्रती सर्व राजकीय पक्षांचा सकारात्मक प्रतिसाद महिला सक्षमीकरणासाठी उपयोगी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.