मुंबईतील घाटकोपर असल्फा परिसरामध्ये भीषण अपघात (Asalfa Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (गुरुवारी) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने ३ ते ४ जणांना उडवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील पुलाचं काम रखडलं आहे. मुंबई महानगरपालिकेने तो धोकादायक असल्याचंही जाहीर केलं आहे. मात्र तरीदेखील पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. हा पुल धोकादायक असला तरी तो पाडला नसल्याचा किंवा पुलाला कठडे लावले नसल्याने या पुलावर सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
(हेही वाचा – Lonavala Tourism Development : पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचे पाऊल, लोणावळ्यात उभारणार ‘ग्लास स्कायवॉक’)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या घाटकोपर असल्फा परिसरामध्ये भरधाव वेगात जात असलेली कार पुलाला धडकली त्यामुळे मोठा अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलामध्ये कोसळली. पुढे चालत जात असणाऱ्या ३ ते ४ जणांना ही कार धडकली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे, तर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार भरधाव वेगात होती, कारने पुढे चालत असणाऱ्यांना उडवलं त्यानंतर कार पुढे पुलाच्या कडेला अडकली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community