ठिकठिकाणी विनापरवाना भरणाऱ्या आठवडी बाजारांमुळे होणारी वाहतूक कोंडी, प्रचंड अस्वच्छता, स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, बेकायदा पार्किंग व अन्य समस्यांविषयी वारंवार तक्रारी आल्यानंतर अखेर उशिराने का होईना, पालिकेला जाग आली आहे. आठवडी बाजार भरविणाऱ्या शेतकरी संघ अथवा कंपन्यांशी चर्चा करून पालिकेने नियमावली तयार करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी व संत शिरोमणी सावता माळी रयत शेतकरी आठवडी बाजार आयोजित करणारे शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी बचत गट व आयोजकांची बैठक उपायुक्त माधव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार, ही नियमावली तयार करण्यात आली. आठवडी बाजार भरविणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ, किंवा कंपन्यांसाठी विविध अटीही लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्तोरस्ती भरणाऱ्या अनधिकृत बाजारांना चाप बसण्याची शक्यता वाढली आहे.
(हेही वाचा – Women’s Reservation Bill : नारी शक्ती वंदन विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर )
शहरामध्ये प्रकल्प संचालक (आत्मा) पुणे कृषी विभाग व पुणे महानगरपालिकेची परवानगी बंधनकारक राहील. रस्त्यावर अथवा पदपथावर अतिक्रमण करून बाजार भरवात येणार नाही. महापालिकेच्या अॅमिनिटी स्पेस अथवा राखीव जागांवर विना परवाना बाजार सुरू करता येणार नाही. बाजाराच्या ठिकाणी कोणीही व्यसन करणार नाही, अस्वच्छता करणार नाही. बाजारात ताजा, निवडक, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण शेतमालच विकला जाईल, याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आयोजकांची राहील. ग्रामीण युवकांचे हित जपून त्यांना रोजगार देण्याचे हमीपत्र बंधनकारक राहील. शेतमाल विक्रीस शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट यांनी जागेची मागणी केल्यास व योग्य कारणाशिवाय जागा नाकारल्यास आयोजकांची परवानगी रद्द करणेत येईल, असेही या नियमावलीत म्हटले आहे.
आठवडी बाजार भरवणाऱ्या शेतकरी उत्पादक संघासाठी नियमावली –
– शेतकरी उत्पादक कंपनी-सहकारी संस्था असणे बंधनकारक आहे.
– कंपनी-संस्थेचे किमान अडीचशे सभासद आवश्यक आहे.
– संस्थेचे नियमित लेखापरीक्षण व कर भरणा गरजेचा आहे.
– आवश्यक कर, भाडे अथवा फी चा नियमितपणे भरणा असावा.
– संस्थेने सभासदांकडून फी व्यतिरिक्त अन्य रक्कम स्वीकारू नये.
– सभासदांनी आवश्यक कागदपत्र कायम बाळगणे बंधनकारक आहे.
– गटाचे उत्पादन व भविष्यातील शेतमालाचे नियोजन बंधनकारक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community