Equinox : विषुवदिनी अनुभवा दिवस-रात्र समान; काय आहे विशेष…

308
Equinox : विषुवदिनी अनुभवा दिवस-रात्र समान; काय आहे विशेष...
Equinox : विषुवदिनी अनुभवा दिवस-रात्र समान; काय आहे विशेष...

खगोल अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी आहे. (Equinox) दरवर्षी २३ सप्टेंबर आणि २१ मार्च हा विषुवदिन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो. या दिवशी पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर राहतात. त्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. यंदा शनिवारी ही स्थिती तयार होऊन समान दिवस-रात्र अनुभवता येणार आहे, असे खगोल अभ्यासक सांगतात. खगोलप्रेमींनी व भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २३ सप्टेंबरला प्रत्यक्ष कालमापन करावे व अनुभव घेण्याचे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification Petition : दिल्लीत अनेक तज्ञांबरोबर चर्चा – राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण)

दिवस आणि रात्रीची असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासांपेक्षा मोठा आणि रात्र १२ तासांपेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो, तेव्हा पृथ्वीवर दिवस आणि रात्र समान असते, पृथ्वीच्या गतीमुळे या दिवसाला दरवर्षात थोडाफार फरक पडू शकतो. (Equinox)

२१ मार्च, २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात. या दोन्ही दिवशी प्रकाशवृत्त उत्तर आणि दक्षिण धृवातून जाते; म्हणून या दिवशी दिवस व रात्र समान वेळेची असते. आकाशात वैषुवीक आणि आयनिक वृत्ताचे २ काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूतून २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, त्याला वसंत संपात बिंदू म्हणतात. त्याच्या विरुद्ध बिंदूत २२ किंवा २३ सप्टेबरला सूर्य प्रवेश करतो. त्याला शरद संपात बिंदू म्हणतात. (Equinox)

पृथ्वीच्या भ्रमणामुळे तिचा उत्तर वा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कमी-अधिक झुकलेला राहतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस-रात्री लहान वा मोठ्या होतात. ऋतु उद्भवतात. तसेच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन घडते. (Equinox)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.