Fireworks : फटाक्यांमध्ये बेरियमचा वापर करण्यास परवानगी नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

147
Fireworks : फटाक्यांमध्ये बेरियमचा वापर करण्यास परवानगी नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Fireworks : फटाक्यांमध्ये बेरियमचा वापर करण्यास परवानगी नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

दिवाळीपूर्वी देशभरात फटाक्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. (Fireworks) फटाक्यांमध्ये रसायन म्हणून बेरियमचा वापर करण्यास परवानगी देता येणार नाही, असा पुनरुच्चार न्यायालयाने पुन्हा केला. फटाके उत्पादक कंपन्यांनी न्यायालयाकडे ही मागणी केली होती. यासोबतच न्यायालयाने फटाके उत्पादक कंपन्यांची मागणीही फेटाळली आहे, ज्यात त्यांनी संयुक्त फटाके तयार करण्याची आणि वापरण्याची परवानगी मागितली होती. तज्ञ संस्थेच्या मताच्या आधारे सरकारने ग्रीन फटाक्यांची निर्मिती आणि विक्री सुनिश्चित करण्यासाठी एक यंत्रणा मंजुरीसाठी न्यायालयासमोर ठेवली होती. फटाक्यांमध्ये बेरियम क्लोराईडला परवानगी दिली जाऊ शकते, असे CSIR (Council of Scientific & Industrial Research) आणि NEERI (National Environmental Engineering Research Institute) या संस्थांनी म्हटले आहे. भाजप नेते मनोज तिवारी यांनी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर पूर्ण बंदीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती.

दिल्लीत संपूर्ण फटाकेबंदी कायम 

आजच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याबाबत काहीही सांगितले नाही. (Fireworks) याचा अर्थ दिल्ली सरकारने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर घातलेली संपूर्ण बंदी कायम राहणार आहे; म्हणजेच दिल्लीत ग्रीन फटाक्यांच्या वापरास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, ज्या राज्यांमध्ये सरकारने फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे, त्या राज्यांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे या सुनावणीदरम्यानही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

फटाक्यांच्या वापरावर पूर्ण बंदी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे, असे त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. (Fireworks) केवळ हानीकारक स्फोटके असलेल्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. असे असतांनाही दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ‘कोणत्याही सरकारने फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली असेल, तर आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. जर कोणत्याही राज्य सरकारला फटाक्यांमुळे समस्या आहे, असे वाटत असेल आणि त्यावर पूर्ण बंदी लादली असेल, तर राज्य सरकार तसा निर्णय घेऊ शकते’, ‘, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले होते.

ग्रीन फटाके इतर राज्यांमध्ये वापरता येणार

ज्या राज्यांमध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी नाही, तेथे ग्रीन (पर्यावरणाची हानी न करणारे) फटाके वापरता येतील. तथापि, यापैकी काही विशिष्ट श्रेणीतील फटाक्यांना परवानगी दिली जाणार नाही. वास्तविक, याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश कायम राहणार आहे. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केवळ बेरियमसारखे रसायन असलेल्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही आणि 2018 च्या जुन्या आदेशानुसार ग्रीन फटाक्यांच्या वापरास परवानगी आहे. (Fireworks)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.