Black Raisins Benefits : काळ्या मनुका खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर

काळ्या मनुकांचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते

208
Black Raisins Benefits : काळ्या मनुका खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर
Black Raisins Benefits : काळ्या मनुका खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर

काळ्या द्राक्षांपासून तयार केलेल्या काळ्या मनुका. (Black Raisins Benefits) फायबर, प्रथिने, सोडियम, शुगर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि लोह हे शरीराला पोषक घटक या मनुकांमध्ये जास्त प्रमाणात असतात. यामुळे रक्तदाब, ह्रदयविकार, पोटाचे आजार, हाडांचा कमकुवतपणा, त्वचाविकार आणि केसांच्या आरोग्यासाठी काळ्या मनुका विशेष गुणकारी ठरतात. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी काळ्या मनुका खाल्ल्यास फायदा होतो. औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असलेल्या काळ्या मनुका खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या –

पचनविकारावर गुणकारी
काळ्या मनुकांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. पचनक्रियेतील अडथळे दूर होतात. बद्धकोष्ठतेच्या समस्ये काळ्या मनुका खाव्यात. काळ्या मनुका पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी या मनुकांचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.

अशक्तपणावर फायदेशीर
काळ्या मनुकांमध्ये लोह जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता काळ्या मनुका खाल्ल्याने भरून निघते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आवश्यकतेप्रमाणे काळ्या मनुकांचे सेवन करावे.

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : सर्वच महामंडळाच्या योजनांमध्ये एकसारखेपणा आणणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्णयांचा धडाका)

रक्तदाबावर नियंत्रण
वाढत्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायबर आणि पोटॅशियम महत्त्वाचे असते. ही दोन्ही पोषक तत्त्वे काळ्या मनुकांमध्ये असतात. त्यामुळे काळ्या मनुकांचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते.

ह्रदयाचे आरोग्य सुधारते
काळ्या मनुका नियमित खाल्ल्याने ह्रदयाचे आरोग्य सुधारते. यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका टाळण्यास काळ्या मनुका डॉक्टरांच्या सल्ल्लयाने खाव्यात.

केसांसाठी गुणकारी
काळ्या मनुकांमध्ये लोह आणि जीवनसत्त्व सी असते. यामुळे केसांना पोषण मिळते. केसगळतीची समस्या असलेल्यांनी काळ्या मनुका खाव्यात तसेच पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यासाठीही काळ्या मनुका खाल्ल्यास फायदा होऊ शकतो.

त्वचेसाठी फायदेशीर
काळ्या मनुकांमधील पोषक तत्त्वे त्वचेसाठी गुणकारी असतात. यामुळे त्वचा तजेलदार व्हायला मदत होते. या मनुकांचे नियमित सेवन केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.