Udayanidhi Stalin : सनातन धर्माचा अवमान करणारे उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; काय म्हणाले न्यायालय..

137
Udayanidhi Stalin : सनातन धर्माचा अवमान करणारे उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; काय म्हणाले न्यायालय..
Udayanidhi Stalin : सनातन धर्माचा अवमान करणारे उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; काय म्हणाले न्यायालय..

सनातन धर्माविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. (Udayanidhi Stalin) उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकार, द्रमुख खासदार ए. राजा., सीबीआय आणि इतर यांना नोटीस बजावली आहे. उदयनिधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या नोटिसा पाठवल्या आहेत; मात्र सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांच्या वक्तव्याला द्वेषयुक्त भाषण मानण्यास नकार दिला आहे. ‘तमिळनाडूमध्ये सनातन धर्माविरोधात होणारे कार्यक्रम असंवैधानिक घोषित करण्यात यावेत’, अशी मागणी करणारीही याचिका चेन्नईच्या एका वकिलाने दाखल केली आहे.

(हेही वाचा – अखेर जेडीएस पक्ष NDA मध्ये झाला सामील; 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी)

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, द्वेषयुक्त भाषणावर प्रलंबित असलेल्या इतर याचिकांसह या प्रकरणाची सुनावणी करण्यात येईल. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने बी. जगन्नाथ यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना हे वक्तव्य केले आहे. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी उदयनिधींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बी. जगन्नाथ यांनी याचिकेद्वारे केली होती. (Udayanidhi Stalin)

उदयनिधी स्टॅलिन यांची सनातनद्वेषी पार्श्वभूमी

‘सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे’, असे विखारी उद्गार उदयनिधी स्टॅलिन यांनी काढले होते. त्यावर टीका होऊ लागल्यावर ट्विटच्या माध्यमातून काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. उदयनिधी स्टॅलिन यांनी 2 सप्टेंबर रोजी चेन्नईतील कामराजर मैदानात आयोजित ‘सनातन निर्मूलन परिषदे’त सहभागी होताना हे वादग्रस्त विधान केले होते. (Udayanidhi Stalin)

उदयनिधी स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावर भाजपने द्रमुक आणि विरोधी आघाडी I.N.D.I.A.वर टीकेची झोड उठवली आहे. हे वक्तव्य समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहांपर्यंत सगळ्यांनीच या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सनातन धर्मावरील टीकेचा सर्वानी निषेध व्यक्त केला आहे. ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले नाही, कारण त्या विधवा आहे आणि आदिवासी समाजातील आहेत. (Udhayanidhi Stalin) यालाच आपण सनातन धर्म म्हणतो का ?’ , अशीही गरळओक उदयनिधी स्टॅलिन यांनी केली होती.

उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच प्रमुख विरोधी पक्ष AIADMK ला सनातन धर्माबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. ‘माजी मुख्यमंत्री आणि द्रविड चळवळीचे नेते सीएन अण्णादुराई यांनी याला (सनातन) कडाडून विरोध केला होता. पेरियार ई.व्ही. रामासामी, बीआर आंबेडकर आणि अण्णादुराई यांनी सांगितलेले नसलेले सनातनबद्दल मी असे काहीही बोलले नाही’, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी दिले होते. (Udayanidhi Stalin)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.