मालाड पश्चिम येथे २८ऑगस्ट रोजी फॉरेक्स एक्सचेंजचे कर्मचारी कंपनीची ७५ लाख रुपयांची रोकड घेऊन मालक भावीक पटेल यांना देण्यासाठी मार्वे रोडने रिक्षाने निघाले होते. दरम्यान तीन वेगवेगळ्या दुचाकीवरून आलेल्या आठ ते नऊ जणांनी या कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या जवळील रोकड असलेल्या दोन्ही बॅगा घेऊन धूम ठोकली होती. याप्रकरणी मालाड पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून सप्टेंबर महिन्यात मालाड पोलिसांनी एका फॉरेक्स कंपनीच्या
कर्मचाऱ्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. हा दरोडा लेडी डॉन करीना शेख (Kareena Shaikh) हिच्या सांगण्यावरून टाकण्यात आल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर मालाड पोलिसांनी करीना शेख उर्फ आपा हिला अटक करण्यात आली आहे. करीना हिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खून,खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्रेचा व्यापार करणे या प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या करीना शेख (Kareena Shaikh) उर्फ आपा उर्फ करीमा मुजी शाह ही घाटकोपर मध्ये ‘गॉडमदर’ म्हणून ओळखली जाते. घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलांना तसेच नोकरीच्या शोधात परराज्यातून मुंबईत येणाऱ्या तरुणांना आश्रय त्यांना गुन्हेगारीकडे वळवणाऱ्या करीना शेख ही या तरुणांसाठी आपा आणि मम्मी म्हणून लओळखली जाते, ती चालवत असलेल्या टोळीतील गुंड आपा, मम्मी या नावाने संबोधतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, करीना शेखने मुंबईत नोकरीच्या शोधात येणाऱ्या तरुणांना तसेच घरातून पळून येणाऱ्या अल्पवयीन मुलांना आश्रय देऊन त्यांना चोरी, घरफोडीचे धडे करीना देते,त्यानंतर ही मुले तिच्या इशाऱ्यावरून चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंग करून चोरीचा सर्व ऐवज करीना कडे जमा करतात.
करीना शेख हि राहण्यास असलेल्या घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगर झोपडपट्टी पट्ट्यात बेकायदेशीर घरे बांधण्यास सुरुवात केली, ही घरे भाड्याने देऊन त्यातून येणाऱ्या पैशातून तिचा उदरनिर्वाह चालत होता. पुढे हीच संपत्ती विकून तीने भरपूर पैसा कमावला. २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तिला शेवटची अटक केली होती त्यानंतर ती जामिनावर बाहेर पडली आणि वर्सोवात राहण्या आली.