ABP News : एबीपी न्यूजच्या पत्रकाराची जाहीर कार्यक्रमात दहशतवादी पन्नूला ऑफर; गंभीर दखल घेत केंद्र सरकारने सुनावले

188

शीख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी संघटनेचा नेता गुरपतवंत सिंग पन्नू एबीपी न्यूज वृत्तवाहिनीवर दिसला. त्यावेळी एबीपी न्यूजचे (ABP News) पत्रकार जगविंदर पटियाल यांनी दहशतवादी पन्नूला वारंवार ‘आप’ असे आदरार्थी संबोधत होते. इतकेच नाही तर तुम्ही भारतात आल्यास जनमत घेण्यासाठी मी स्वतः तुमच्यासोबत पंजाबला येईन, असेही ते म्हणाले. एबीपी न्यूजने आता या मुलाखतीचा व्हिडिओ आणि त्याच्याशी संबंधित बातम्या हटवल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने घडल्या प्रकारावर एबीपी न्यूजला चांगले खडे बोल सुनावले आहे. कोणत्याही टीव्ही चॅनलने दहशतवाद्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ नये, असे सरकारने म्हटले.

एबीपी न्यूजने (ABP News) गुरपतवंत सिंग पन्नू याची ‘ऑपरेशन गद्दार’ शीर्षकाखाली मुलाखत घेतली. त्यामध्ये एबीपी न्यूजचे कार्यकारी संपादक जगविंदर पटियाल यांनी पन्नू याच्याशी संवाद साधला. यामध्ये पन्नू सतत खलिस्तानचे समर्थन करत होता. त्याचवेळी पंजाबला वेगळा देश बनवण्याची मागणी करत होता. असे असूनही जगविंदर पटियाल हा पन्नूला ‘आप’ आणि ‘मिस्टर पन्नू’ असे आदरार्थी संबोधित करत होता. इतकेच नव्हे तर पन्नू याने जेव्हा त्याच्याविषयी जनमत निर्माण करण्याची गोष्ट केली, तेव्हा पटियाल यांनी पन्नूला म्हटले की, पंजाबमध्ये निवडणूक होत आहे. तेथील जनता मतदान करून सरकार बनवते. तुम्ही इथे यावे, जर लोक तुमच्यासोबत उभे राहिले, तर तुम्हाला मुख्यमंत्री बनवतील. मी तुम्हाला सांगतो तुम्ही आधी इकडे या, मी तुमच्यासोबत पंजाबमध्ये जनमत निर्माण करेन. जर लोक तुमचा अजंडा बरोबर आहे असे म्हणाले तर तुम्हाला मुख्यमंत्री बनवेल. या दरम्यान पटियाल याने देशाचे संविधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा Udayanidhi Stalin : सनातन धर्माचा अवमान करणारे उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; काय म्हणाले न्यायालय..)

टीव्ही चॅनल दहशतवाद्यांचे व्यासपीठ बनू नये 

केंद्र सरकारने गुरुवार, २१ सप्टेंबर रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केले, त्यामध्ये टीव्ही चॅनलने अशा कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या व्यासपीठाचा वापर करू देऊ नये, ज्याच्यावर दहशतवादासारखा किवा अन्य गंभीर स्वरूपाचा आरोप आहे, अथवा ज्यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. नुकतेच एका टीव्ही चॅनलने अशाच एका व्यक्तीची मुलाखत घेतली, ज्यांच्यावर दहशतवादासारखा आरोप आहे. तसेच ती व्यक्ती अशा संघटनेशी संबंधित आहे, ज्याला सरकारने बंदी घातली आहे. या मुलाखतीच्या वेळी देशाची अखंडता, सुरक्षा तसेच अन्य देशाशी मैत्रीपूर्ण संबंधांशी हानिकारक ठरतील अशी वक्तव्ये करण्यात आली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.