सर्वोच्च न्यायालयाने मथुरेतील शाही ईदगाह मशिदीतील वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. (Krishna Janmabhoomi) ‘मथुरेतील शाही ईदगाह मशीद कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे’, असा दावा करत हिंदू संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. यासंबंधीच्या याचिकेवर २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली.
या वेळी न्यायालयाने म्हटले आहे की, या वैज्ञानिक सर्वेक्षणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल द्यावा. हा उच्च न्यायालयाचा विषय आहे. तिथेच यासंबंधीचा खटला चालवावा. तसेच तिथे यासंबंधीची इतर प्रकरणे प्रलंबित आहेत. आम्ही सध्या या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही.
(हेही वाचा – ABP News : एबीपी न्यूजच्या पत्रकाराची जाहीर कार्यक्रमात दहशतवादी पन्नूला ऑफर; गंभीर दखल घेत केंद्र सरकारने सुनावले)
ट्रस्टने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हिंदूंची मंदिरे पाडून त्याजागी ही मशीद उभारण्यात आली होती. (Krishna Janmabhoomi) त्यामुळे अशा बांधकामाला मशीद मानता येणार नाही. प्रतिवाद्यांनी या वास्तूचे नुकसान केले आहे. प्रतिवाद्यांमध्ये शाही मशीद ईदगाह व्यवस्थापन समितीसारख्या संस्थांचाही समावेश आहे. हिंदू मंदिराचे पुरावे असलेल्या मालमत्तेचे नुकसान केले आहे.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ विधीज्ञ सार्थक चतुर्वेदी यांनी ट्रस्टची बाजू मांडली. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती शुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर २२ सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी झाली.
शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्ण जन्मस्थानाकडे हस्तांतरित करण्याची मागणी
काशी आणि मथुरेचा वाद अयोध्येसारखाच आहे. मथुरा शहरातील कृष्णजन्मभूमी येथे शाही ईदगाह मशीद उभी आहे. (Krishna Janmabhoomi) इस्लामिक आक्रमक औरंगजेबाने प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि १६६९ मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. त्यानंतर मथुरेतील शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. मथुरेतील संघर्ष ठाकूर केशवजी महाराज यांच्या मालकीच्या एकूण १३.३७ एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून आहे आणि त्यांच्या जमिनीवर श्री कृष्णजन्मभूमी वसलेली आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्ण जन्मस्थानाकडे हस्तांतरित करण्याची मागणी हिंदू बाजू करत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये, कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने दिवाणी न्यायाधीश, मथुरा यांच्यासमोर दावा दाखल केला. त्यांनी त्यांच्या हिताचे आणि घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याच्या विनंतीसह नकाशा जोडला. शिवाय, ज्या ठिकाणी शाही मशीद इदगाह नावाने ओळखली जाणारी वादग्रस्त रचना अस्तित्वात आहे त्या ठिकाणी कृष्ण जन्मभूमी पुनर्संचयित करण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. (Krishna Janmabhoomi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community