महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक श्री तुळजाभवानी देवी. (Tuljabhavani Online pooja) संपूर्ण महराष्ट्रासह देशभरातील नागरिक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यापैकी अनेक जणांची ही कुलदेवता असल्याने येथे कुलाचार आणि कुलधर्माचे पालन करण्यासाठीही अनेक जण येतात. देवीच्या भाविकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेला विशेष महत्त्व आहे. ही पूजा आता भक्त आणि भाविकांना ऑनलाईन करता येण्याची सोय मंदिर संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता http://shrituljabhavani.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑक्टोबर २०२३ पासून सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात केले जाणार असल्याची माहिती मंदिर संस्थानमार्फत देण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी देवीजींचा शारदीय नवरात्र महोत्सव ०६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. श्री देविजींची मंचकी निद्रा ७ ते १४ ऑक्टोबर व २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत आहे. त्यामुळे या कालावधीत सिंहासन पूजा बंद राहतील. तसेच ऑक्टोबर 2023 मधील इतर दिवशी सिंहासन पूजा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील याची सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी, सेवेकरी व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे मंदिर संस्थानकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा : western Railway : अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे ३ पर्यंत चालू राहणार लोकल सेवा)
मंदिर प्रशासनाकडून आवाहन
भाविकांनी सिंहासन पूजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ http://shrituljabhavani.org वरून सिंहासन पूजा पास बुकींग या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर http://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पूजेची नोंदणी करावी आणि सिंहासन पूजा नोंदणीचा लाभ घ्यावा, असे श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community